गडचिरोली : सुरवातीपासूनच विविध कारणांनी वादग्रस्त ठरलेला सूरजागड लोहप्रकल्प पुन्हा एकदा नक्षलवाद्यांच्या निशाण्यावर आला आहे. गुरुपल्ली परिसरात आढळलेल्या नक्षलपत्रकात खाण ‘मफियां’कडून नोकरीच्या नावावर आदिवासी महिलांचे लैंगिक शोषण होत असल्याचा आरोप केल्याने खळबळ उडाली आहे. स्पेशल दंडकारण्य झोनल कमेटी, दक्षिण गडचिरोली प्रवक्ता कार्तिककुमारच्या नावाने हे पत्रक आहे.

दीड वर्षापासून सूरजागड टेकडीवर लोहखनिजाचे उत्खनन सुरू आहे. कंपनीकडून आणि प्रशासनाकडून स्थानिक रोजगाराच्या बाबतीत नेहमीच मोठ मोठे दावे केल्या जाते. परंतु वास्तविक परिस्थिती वेगळी आहे. काही खाण ‘माफिया’ प्रशासनाला हाताशी धरून या भागात आपली मनमानी चालवत असल्याचे चित्र आहे. यातीलच दोघे आदिवासी महिलांना नोकरीचे आमिष दाखवून त्यांचे लैंगिक शोषण करीत आहे. असा आरोप नक्षल्यांच्या पत्रकात करण्यात आला आहे. इतकेच नव्हे तर काही आदिवासी तरुणांकडून या दोघांनी नोकरीसाठी पैसेदेखील घेतल्याचा उल्लेख आहे. या दोघांचा खाण परिसरात वावर असतो. पोलिसांचा धाक दाखवून ते येथील महिलांची छेड काढतात. असे अनेक गंभीर आरोप या पत्रकात करण्यात आले आहे. हे सर्व बंद न केल्यास दोघांना ठार मारण्यात येईल, अशी धमकीदेखील देण्यात आली.

हेही वाचा – नागपूर : देवदर्शनाला नेतो असे सांगून जंगलात प्रियकाराचा प्रेयसीवर बलात्कार

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गुरुपल्ली मार्गावर शनिवारी रात्री हे पत्रक लावण्यात आले होते. त्यामुळे हे पत्रक नक्षल्यांनीच टाकले की कुणी दुसऱ्याने याबाबत शंका उपस्थित केल्या जात आहे.