नागपूर : लग्नाच्या जेमतेम दोन महिन्यांतच नवविवाहितेने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना कोराडीत उघडकीस आली. वर्षा ऊर्फ सीमा मंगेश कडू (२६, श्री. गजानन अपार्टमेंट, प्रेमनगर, कोराडी) असे मृत महिलेचे नाव आहे.

मंगेश कडू हा एका राजकीय पुढाऱ्याच्या खासगी कार्यालयात लिपिक आहे. त्याचे पहिले लग्न झाले होते. पहिल्या पत्नीकडून एक मुलगी असून सध्या घटस्फोट झाला आहे. दरम्यान, त्याची नातेवाईक असलेली वर्षा हिच्याशी ओळख झाली. वर्षाचेही पहिले लग्न झाले होते. तीसुद्धा घटस्फोटीत असून एकटी राहत होती.

हेही वाचा – राष्ट्रपतींच्या उपराजधानीतील दोन्ही कार्यक्रमांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची दांडी, चर्चांना उधाण…

हेही वाचा – ‘डीपफेक’ व्हिडीओवर राष्ट्रपतींनी व्यक्त केली चिंता; म्हणाल्या, “तंत्रज्ञानाचा वापर…”

मंगेश आणि वर्षा यांनी दोन महिन्यांपूर्वी लग्न केले. कोराडीत एका सदनिकेत दोघांनीही संसार सुरु केला. मात्र, महिन्याभरातच दोघांचे क्षुल्लक कारणावरून खटके उडायला लागले. त्या रागातून वर्षाने शुक्रवारी सायंकाळी घरात कुणी नसताना गळफास घेऊन आत्महत्या केली. मंगेश घरी आला असता पत्नी गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आली. या प्रकरणी कोराडी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.