scorecardresearch

नागपूर : ‘ज्येष्ठ नागरिकांसाठी लवकरच समपुदेशकाची नियुक्ती’

ज्येष्ठांच्या मदतीसाठी शहरी भागासह ग्रामस्तरावर स्वंयसेवी संघटनांच्या मदतीने समुपदेशकांची नियुक्ती करण्यात येणार आहे.

नागपूर : ‘ज्येष्ठ नागरिकांसाठी लवकरच समपुदेशकाची नियुक्ती’
ज्येष्ठ नागरिकांसाठी लवकरच समपुदेशकाची नियुक्ती

ज्येष्ठ नागरिकांच्या विविध समस्यांची सोडवणूक करण्यासाठी सामाजिक न्याय विभागात ज्येष्ठ नागरिक कक्ष स्थापन करण्यात आला आहे. लवकरच समुपदेशकाची नियुक्ती केली जाईल, असे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी सांगितले.

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाव्दारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात ज्येष्ठ नागरिक व ज्येष्ठ नागरिकांसाठी काम करणाऱ्या संस्थांचा शनिवारी जिल्हाधिकारी डॉ. इटनकर यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. त्याप्रसंगी ते बोलत होते. ज्येष्ठ नागरिक धोरणानुसार सामाजिक न्याय विभागाव्दारे ज्येष्ठ नागरिकांसाठी विविध कल्याणकारी योजना राबविल्या जातात. ज्येष्ठांच्या मदतीसाठी शहरी भागासह ग्रामस्तरावर स्वंयसेवी संघटनांच्या मदतीने समुपदेशकांची नियुक्ती करण्यात येईल, असे डॉ. इटनकर म्हणाले.

हेही वाचा- भंडारा : पालकमंत्री येणार म्हणून रात्रभर जागून केली रस्त्यांची डागडुजी; नगर पालिकेचा प्रताप

समाजाचे नागरिकीकरण व औद्योगिकीकरणामुळे संयुक्त कुटुंब संकल्पनेचा ऱ्हास झालेला आहे. भारतीय संस्कृती टिकवण्यासाठी आई-वडील, आजी-आजोबासारखे वयोवृध्द हे एक चांगले माध्यम असून तरुण पिढीला नैतिक मूल्यांचे शिक्षण हे त्यांच्याकडून मिळत असते. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या वयोवृध्द आई-वडीलांचा तसेच इतर ज्येष्ठांचा आदर सन्मान करावा, असे उपायुक्त सुरेंद्र पवार म्हणाले. विभागाव्दारे जेष्ठ नागरिकांच्या अडचणीचे निराकरण केले जाते, असे प्रादेशिक उपायुक्त गायकवाड यांनी सांगितले.

हेही वाचा- नागपूर : विदर्भाचे आंदोलन संसदेपर्यंत घेऊन जाणार – डॉ. श्रीनिवास खांदेवाले

जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण सभापती नेमावती माटे व शिक्षण सभापती मालती पाटील, जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते हुकूमचंद मिश्रीकोटकर यांनीही यावेळी समायोचित भाषण केले. यावेळी हुकूमचंद मिश्रीकोटकर, सिस्टर आयरीन, वसंतराव कळंबे, सुरेश रेवतकर, भावना ठक्कर, विभा टिकेकर, भारती सराफ, युगान्त कुंभलकर आदींचा सत्कार करण्यात आला.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या