scorecardresearch

अकोला: पत्नीच्या शोधात सासरी गेला, वाद झाला अन् पुढे घडले असे की पोलिसही चक्रावले…

पती-पत्नीमध्ये सातत्याने वाद होत होता. त्यामुळे माहेरी गेलेल्या पत्नीला भेटायला गेलेल्या जावयाची हत्या करून सासरच्या मंडळींनी आत्महत्येचा बनाव केला.

अकोला: पत्नीच्या शोधात सासरी गेला, वाद झाला अन् पुढे घडले असे की पोलिसही चक्रावले…
प्रातिनिधिक छायाचित्र

पती-पत्नीमध्ये सातत्याने वाद होत होता. त्यामुळे माहेरी गेलेल्या पत्नीला भेटायला गेलेल्या जावयाची हत्या करून सासरच्या मंडळींनी आत्महत्येचा बनाव केला. मात्र, पोलीस तपासात हा बनाव उघडकीस आला असून सासरच्या मंडळींविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा >>>कसा आहे समृध्दी महामार्गाचा आरंभ बिंदू?; एक किलोमीटर क्षेत्र, रांगोळीचा आकार आणि बरेच काही

अकोला जिल्ह्यातील मनारखेड येथे ५ डिसेंबरला ४० वर्षीय व्यक्तीचा मृतदेह आढळला होता. मृत रवी आणि त्याच्या पत्नीत सतत वाद होते. या वादातून पत्नी रागाच्या भरात घर सोडून गेली. पत्नीच्या शोधात तो सासरी गेला. यावेळी सासरच्यांसोबत त्यांचा वाद झाला. दरम्यान, जावई रवी राजगुरे याने स्वतःच्या डोक्यात वार करून आत्महत्या केल्याचा बनाव सासरच्या मंडळींनी केला. या प्रकरणात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली. शवविच्छेदनाच्या प्राथमिक अहवालात प्रकरणाचा उलगडा झाला.

हेही वाचा >>>“डिव्हिजनल कमिश्नर हाजीर हो…” ;लोणार सरोवर संवर्धन दिरंगाईप्रकरणी उच्‍च न्‍यायालयाचे समन्स

मृताचा चुलत भाऊ योगेश राजगुरे यांनी मृत रवीचा मेहुणा, मेहुणी, सासू आणि सासऱ्यांनी जड अवजारने डोक्यात वार करून हत्या केल्याची फिर्याद दिली. या फिर्यादीसह घटनास्थळाच्या पंचनाम्यावरून पोलिसांनी मृताची सासू रमाबाई सुरोशे, मेहुणा जानराव वाहूरवाघ, मेहुणी शारदा जानराव वाहूरवाघ यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला असून आरोपींना अटक केली.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 08-12-2022 at 18:43 IST

संबंधित बातम्या