नागपूर: भारतीय विद्या भवन शाळेतील तिसऱ्या वर्गाचा विद्यार्थी सारंग होमेश्वर नागपुरे याचा फुटबॉल खेळताना शाळेच्या मैदानावरील खड्ड्यात पडून मृत्यू झाल्याच्या घटनेने पालक आणि विद्यार्थीही हादरले आहेत.

शुक्रवारी दुपारी अंबाझरी घाटावर साश्रुनयनांनी नातेवाईक व पालकांच्या उपस्थितीत सारंगच्या पार्थिवावर अत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी भवन्स शाळेत शिकत असलेल्या मुलांच्या पालकांमध्ये शाळा प्रशासनाच्या विरोधात प्रचंड रोष दिसून आला.

हेही वाचा… थंडीत श्वसन विकाराचे रुग्ण वाढले; दिवाळीत रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा धोका

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सारंग भारतीय विद्या भवनच्या कळमेश्वर नजिकच्या आष्टी येथील शाळेतील तिसऱ्या इयत्तेतील विद्यार्थी होता. त्याचे वडील एका अभियांत्रिकी महाविद्यालयात प्राध्यापक तर आई वकील आहे.सारंगला एक मोठा भाऊ आहे. सदर शाळेतील विद्यार्थी दुपारी १.३० वाजताच्या सुमारास लाँग ब्रेकनंतर शाळेच्या आवारात एका कोपऱ्यात खेळत होते. याच भागात सांडपाणी वाहून नेणारी नाली असून, त्यावर कोणत्याही प्रकारचे झाकण नाही. खेळता खेळता सारंग त्या नालीमध्ये पडला यात त्याला गंभीर दुखापत होऊन मृत्यू झाला. या वेदनादायी घटननेने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.