भंडारा : भरधाव टिप्पर आणि दुचाकी अपघातात दुचाकीवरील आजोबा आणि नातीचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ही घटना आज, शनिवारी दुपारच्या सुमारास नागपूर नाका येथे घडली. कवळू बडवाईक (७०), वाणी महेंद्र बडवाईक (५) दोघेही रा. नवीन पुनर्वसन पिंडकेपार (बेला) असे अपघातात ठार झालेल्या आजोबा आणि नातीचे नाव आहे.

हेही वाचा – चंद्रपूर: वाघिणीसह बछड्याचा मृतदेह सापडला; शिकार की नैसर्गिक मृत्यू ?

हेही वाचा – भर उन्हाळ्यात संततधार!, चंद्रपूर जिल्ह्याला झोडपले

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बडवाईक आयुध निर्माणीतून सेवानिवृत्त झाले होते. त्यांची नात वाणी ही भंडारा येथील गायत्री विद्या मंदिरात शिक्षण घेत होती. तिला दररोज सकाळी शाळेत घेऊन जाणे व सुटीनंतर तिला परत आणणे असा त्यांचा नित्यक्रम होता. दरम्यान, आज दुपारी शाळेला सुटी झाल्यानंतर ते वाणीला घेऊन गावाकडे येत असताना भरधाव टिप्परने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. यात दोघांचाही घटनास्थळीच मृत्यू झाला. याप्रकरणी भंडारा पोलिसांनी टिप्परचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.