scorecardresearch

भर उन्हाळ्यात संततधार!, चंद्रपूर जिल्ह्याला झोडपले

शहर तथा जिल्ह्यातील काही भागात दुपारी एक वाजतापासून संततधार पाऊस सुरू आहे.

rain
(संग्रहित छायाचित्र/लोकसत्ता)

चंद्रपूर: शहर तथा जिल्ह्यातील काही भागात दुपारी एक वाजतापासून संततधार पाऊस सुरू आहे. या जिल्ह्यात कडक उन्हाळा सुरू झाला असताना आता अचानक वातावरणात बदल झाला आहे. काल शुक्रवारी राजुरा तालुक्यातील सिंधी गावात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाने हजेरी लावली. त्यानंतर आज दुपारी १२.३० वाजेपर्यंत कडक उन तापले होते. मात्र अचानक आकाशात काळे ढग जमा झाले. त्यानंतर संततधार पाऊस सुरू झाला. हा पाऊस सर्वदूर सुरू आहे. चंद्रपूर शहर तथा ब्रम्हपुरी तालुक्यातील काही भागात पावसाच्या धारा सुरू असल्याने शेतीचे नुकसान झाले आहे. पावसामुळे शहरातील काही भागातील वीज पुरवठा देखील खंडित झाला आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 25-03-2023 at 17:46 IST

संबंधित बातम्या