अ मैत्रिणीवर बलात्कार करून त्याची चित्रफीत काढून ती समाजमाध्यमात प्रसारित करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार शेगाव येथे उघडकीस आला आहे. याप्रकरणी आरोपी प्रतीक गजानन मानकर (२२) याला पोलिसांनी अटक केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शेगाव येथे दर्शनासाठी येण्याची गळ घालून युवकाने २० वर्षीय पीडित युवतीला लॉजवर नेले. लग्नाचे आमिष दाखवून त्याने जबरीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. डिसेंबर २०२१ ते ३ ऑगस्ट २०२२ दरम्यान त्याने हे कृत्य वारंवार केले. त्याची चित्रफीत देखील काढली. युवतीने नेहमी येण्यास नकार दिल्याने आराेपीने ती चित्रफीत ‘व्हॉटस्ॲप’वर ‘स्टेटस’ ठेवून प्रसारित केली. याप्रकरणी पीडित युवतीने शेगाव शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून आरोपी प्रतीक मानकर रा. वाडेगाव जि. अकोला याच्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A video of his girlfriend being raped was broadcast accused arrested by shegaon police amy
First published on: 04-08-2022 at 19:32 IST