भंडारा: धाकट्या बहिणीची घटस्फोटाची केस लढत असलेल्या महिला वकीलावर तिच्या बहीण जावयाने चाकूने हल्ला केल्याची घटना आज दुपारी ११.३० वाजताच्या समारास जिल्हा सत्र न्यायालयाच्या समोर घडली. सरिता माकडे असे हल्ला झालेल्या महिला वकिलाचे नाव आहे.

सरिता माकडे या व्यवसायाने वकील असून त्या जिल्हा सत्र न्यायालयात कार्यरत आहेत. सरिता यांच्या बहिणीचे लग्न २०१४ साली झाले. मात्र काहीच काळानंतर त्या दांपत्यामध्ये खटके उडायला सुरवात झाली. हळूहळू दोघांमधील कौटुंबिक वाद टोकाला जाऊन प्रकरण घटस्फोटापर्यंत आले.

हेही वाचा… तलवारीने केक कापून ‘हॅप्पी बर्थडे’! चौघांविरुद्ध गुन्हे दाखल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सरिता यांनी त्यांच्या बहिणीच्या बाजूने वकीलपत्र घेतले आणि केस लढायला सुरवात केली. त्याचाच राग मनात धरून आज त्या न्यायालयात जात असताना त्यांच्या बहिणीच्या नवऱ्याने त्यांना वाटेत रोखले आणि त्यांच्यावर चाकूने हल्ला केला. यात त्यांच्या चेहऱ्यावर आणि कपाळावर जखमा झाल्या असून या प्रकरणाची पोलीस तक्रार करण्यासाठी सरिता भंडारा पोलीस ठाण्यात गेल्या असून त्यांच्यावर हल्ला करणाऱ्याचे नाव अद्याप कळू शकलेले नाही.