अमरावती : प्रेयसीची आक्षेपार्ह छायाचित्रे तिच्या नियोजित वराला पाठवून एका युवकाने तिचे जुळलेले लग्न मोडले. हा धक्कादायक प्रकार माहुली जहांगिर पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघड झाला. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी विजय रवी मोहिते (२४, रा. वाघोली) याच्याविरुद्ध विनयभंग, सामाजिक बदनामी व माहिती तंत्रज्ञान कायद्यान्‍वये गुन्हा दाखल केला.

२४ वर्षीय पीडित तरुणीचे आरोपीसोबत दोन वर्षांपूर्वीपासून मैत्री व प्रेमसंबंध होते. पीडित युवतीचे आरोपीसोबतच मोबाईलवर नियमित संभाषण होत होते. ती आरोपी युवकाला व्हिडीओ कॉलदेखील करीत होती. दरम्यानच्या काळात आरोपीने तिची खासगी आक्षेपार्ह छायाचित्रे मोबाईलमध्ये संग्रहित करून ठेवले. काही काळानंतर त्यांचे प्रेमसंबंध संपुष्टात आले. दरम्यान, अलीकडे फिर्यादी तरुणीचे दुसऱ्या एका तरुणासोबत लग्न जुळले. ही बाब आरोपी विजय याला माहीत होताच त्याने तिचा पिच्छा पुरविला. वारंवार कॉल करून तू माझ्याशी लग्न कर, असा तगादा लावला. त्यामुळे ती प्रचंड हादरली. तिने त्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र तो समजण्यास तयार नव्हता.

Paytm movie ticketing business to Zomato
पेटीएमचा चित्रपट तिकीट व्यवसाय झोमॅटोकडे
we the documentry maker
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले :‘कान’ महोत्सवापर्यंत नेणारा प्रवास…!
father and daughter connection shown in indian films
उंगली पकड के तूने चलना सिखाया था ना…
success story Heartbroken lover become officer after his girlfriend reject him
VIDEO: स्पर्धा परीक्षेत नापास झाला अन् प्रेयसी सोडून गेली; पुढच्या वर्षी पास होत तिच्याच घरासमोर लावल्या ७५ तोफा
kannada actor darshan arrested in murder case
कन्नड अभिनेता दर्शनला हत्येप्रकरणी अटक; बंगळूरु पोलिसांच्या कारवाईनंतर सहा दिवसांची पोलीस कोठडी
Nagpur, Nagpur Love Triangle case, dispute in love, Friends Clash Leading to Brutal Murder, murder in Nagpur, murder news, Nagpur news,
प्रेयसीला मित्राने केला प्रपोज, युवक संतापला अन् नंतर जे घडलं ते…
Mumbai, Extortion, woman,
मुंबई : चित्रीकरणाच्या माध्यमातून महिलेकडून खंडणी उकळली, आरोपीला पोलिसांकडून अटक
Dinesh Karthik
IPL 2024: दिनेश कार्तिक, महेंद्रसिंग धोनीच्या छायेत आणि संधीच्या प्रतीक्षेत राहूनही स्वत:चं स्थान निर्माण करणारा लढवय्या

हेही वाचा – बुलढाणा: ‘बिजेएस’ करताहेत शेतकरी आत्महत्याग्रस्त व कोविडग्रस्त बालकांचे संगोपन; शिक्षण, निवास, भोजन आणि आरोग्याचीही काळजी

आरोपी विजय मोहिते हा तेवढ्यावरच थांबला नाही, तर त्याने मोबाईलमध्ये संग्रहित करून ठेवलेले युवतीचे आक्षेपार्ह छायाचित्रे व तिने त्याच्याशी पूर्वी व्हॉट्सअ‍ॅपवर केलेले चॅटिंग तिच्या भावी पतीला पाठविले. त्यामुळे तिची चांगलीच बदनामी झाली. आक्षेपार्ह छायाचित्रे व चॅटिंग पाहून नियोजित वराने तिच्यासोबतचे लग्न मोडले. त्यामुळे तरुणीला धक्‍का बसला. तिने माहुली पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी तक्रारीवरून विजय मोहितेविरुद्ध गुन्हा नोंदविला.