नागपूर : शहरातील रस्ते अपघातांवर वाहतूक पोलिसांना नियंत्रण मिळविण्यावर अपयश येत असल्यामुळे अपघातांची मालिका सुरुच आहे. नवीन घटनेत एका भरधाव कारने रस्ता ओलांडणाऱ्या पाच वर्षीय मुलाला धडक दिली. त्या मुलाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना सीआरपीएफ कार्यलयाच्या प्रवेशद्वार क्रमांक दोनसमोरील रोडवर घडली. कृष्णा पवन यादव (५, डिगडोह) असे मृत मुलाचे नाव आहे.

पवन यादव हे एमआयडीसीतील एका कंपनीत काम करतात. रविवारी सकाळी पवन हे पत्नी आणि मुलगा कृष्णा यांच्यासोबत गॅस सिलिंडर आणायला दुचाकीने गेले होते. सिलिंडरसाठी काही पैसे कमी पडत असल्यामुळे पत्नी कृष्णासह एटीएमकडे जात होती. रस्ता ओलांडत असताना एका भरधाव कारने मुलाला जबर धडक दिली. या धडकेत कृष्णाच्या डोक्याला जबर मार लागला. अपघात होताच मोठी गर्दी झाली. काही नागरिकांना कारचालकाला थांबवले. त्याने दवाखान्याचा खर्च करण्याची हमी देऊन जखमी कृष्णाला कारमध्ये घालून वानाडोंगरीतील खासगी रुग्णालयात नेले. तेथे उपचार सुरु असताना पळ काढला. तेथून कृष्णाला मेडिकल रुग्णालयात हलविण्यात आले. उपचारादरम्यान मुलाचा मृत्यू झाला. या प्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला.

Police seized 70 lakh rupess in suspicious car traveling from mp to Maharashtra
मध्य प्रदेशातून महाराष्ट्रात येणाऱ्या वाहनात घबाड
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले…
Accused in hit and run case in Ravet arrested Pune news
पिंपरी: रावेतमधील हिट अँड रन प्रकरण; चार दिवसांनी आरोपी अटकेत, ८० सीसीटीव्ही…
traffic e-challan
ई-चलन घोटाळ्यापासून सावध रहा! ट्रॅफिक चलनच्या नावाखाली होतेय फसवणूक, कसे टाळावे?
Delhi crime News
Delhi : धक्कादायक! टोपीवरून झालेल्या वादातून तरुणाची गोळ्या झाडून हत्या; आरोपीच्या आईने पुरवली बंदूक
dgp Rashmi Shukla
रश्मी शुक्ला यांना महासंचालक पदावरून हटविण्याची मागणी विरोधकांकडून का होतेय? झारखंड पोलीस महासंचालकांचा संदर्भ काय?
navi Mumbai car hit six people
नवी मुंबई: मित्राच्या स्कुटीला धडक मारल्याचा राग आल्याने सरळ पाच – सहा जणांच्या अंगावर घातली गाडी
Anganwadi workers murder case in Ahilyanagar Notice of action to Anganwadi workers
‘सुरक्षेची भाऊबीज ओवाळणी’ ऐवजी अंगणवाडी सेविकांना कारवाईची नोटीस

हेही वाचा >>>संतापजनक! दोन वृद्धांचा दहा वर्षीय मुलीवर अत्याचार; तीन महिन्यांपासून लैंगिक शोषण

पवन आणि राणी यांना दोन मुले आहेत. मुलाचा अपघात झाल्यानंतर कारचालकाने उपचाराचा खर्च करण्याची तयारी दर्शवून खासगी रुग्णालयात दाखल केले व नंतर पळ काढला. आर्थिक अडचणीत असलेल्या दाम्पत्याला खर्च झेपत नसल्यामुळे जखमी मुलाला मेडिकल रुग्णालयात दाखल केले. तेथे डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मुलाचा मृत्यू झाल्याचा आरोपी यादव दाम्पत्याने केला आहे.