लोकसत्ता टीम

नागपूर: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना देण्यात आलेल्या धमकी प्रकरणातील आरोपी जयेश पुजारीकडून पोलिसांना नवनवीन माहिती कळत आहे. त्यात बेळगाव कारागृहात पुजारीला मागणीनुसार मांसाहार मिळत होता. येथून तो स्मार्टफोनवर कुटुंबाशी ‘व्हिडीओ कॉलिंग’ करीत असल्याचेही पुढे येत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पोलीस सूत्रानुसार, जयेश पुजारीने काही वर्षांपूर्वी धर्मपरिवर्तन केले. त्यानंतर त्याचे नाव शाकीर ठेवण्यात आले. पोलीस चौकशीत पोलिसांनी जयेश नाव उच्चारताच तो माझे नाव शाकीर असल्याचे सांगून आक्षेप घेतो. जयेशला कारागृहात मागेल तेव्हा मांसाहार व इतरही सोयी सहज मिळत होत्या. जयेशचा थाट बघता त्याच्यामागे कोणत्या मोठ्या शक्तीचा हात आहे, हा प्रश्न उपस्थित झाला आहे. त्यामुळे या प्रकरणाचा तपास केंद्रीय तपास संस्थेकडे सोपवला जाणार काय, याकडे या क्षेत्रातील जाणकारांचे लक्ष लागले आहे.