२४ तासांत ६ नवीन रुग्णांची भर
नागपूर : जिल्ह्यात २४ तासांत ६ नवीन रुग्ण आढळले. परंतु नवीन रुग्णांहून करोनामुक्त अधिक असल्याने सक्रीय करोनाग्रस्तांची संख्या चाळीसहून खाली नोंदवली गेली. सक्रीय रुग्णांमध्ये शहरातील ३०, ग्रामीणचे ६, जिल्ह्याबाहेरील ३ अशा एकूण ३९ रुग्णांचा समावेश आहे. दिवसभऱ्यात शहरात ३, ग्रामीणला १, जिल्ह्याबाहेरील २ असे एकूण ६ नवीन रुग्ण आढळले. त्यामुळे शहरातील आजपर्यंतच्या करोनाग्रस्तांची संख्या ३ लाख ४० हजार ५९०, ग्रामीण १ लाख ४६ हजार २४८, जिल्ह्याबाहेरील ६ हजार ९१७ रुग्णांवर पोहचली. दिवसभऱ्यात शहरात ५, ग्रामीणला २ असे एकूण सात व्यक्ती करोनामुक्त झाले. त्यामुळे शहरातील आजपर्यंतच्या करोनामुक्तांची संख्या ३ लाख ३४ हजार ६६७, ग्रामीण १ लाख ४३ हजार ६३८, जिल्ह्याबाहेरील ५ हजार २८९ अशी एकूण ४ लाख ८३ हजार ५९४ व्यक्तींवर पोहचली. तर दिवसभऱ्यात जिल्ह्यात एकही मृत्यू नसल्याने शहरातील आजपर्यंतची मृत्यूसंख्या ५,८९३, ग्रामीण २,६०४, जिल्ह्याबाहेरील १,६२५ अशी एकूण १०,१२२ रुग्ण इतकी होती.
चाचण्यांची संख्या घसरली
शहरात दिवसभऱ्यात २ हजार ४०९, ग्रामीणला १८६ अशा एकूण जिल्ह्यात केवळ २ हजार ५९५ संशयितांच्या चाचण्या करण्यात आल्या. ही संख्या रविवारी ३ हजार ६८४ संशयित एवढी होती.
