नागपूर : केव्हाही कुठेही,कुणाचाही रस्ते अपघात झाल्यास त्या जखमी ला त्वरित प्रथमोपचार मिळावा आणि जखमीचे प्राण वाचावे या हेतूने नागरिकांना प्रथमोपचार प्रशिक्षण देण्यासाठी ‘रोडमार्क फाऊंडेशन’ने पुढाकार घेतला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अपघातात जखमी व्यक्तीला मदत करणे हे राष्ट्रीय कर्तव्य समजून त्याच्या उपचारासाठी धावून जाणे ही भावना निर्माण करण्यासाठी फाऊंडेशने अध्यक्ष राजू वाघ यांनी हा उपक्रम हाती घेतला आहे. यातून मदत करणारी एक फळी तयार झाल्यास रस्त्यावर एकही जखमी तरफडताना दिसणार नाही, अशी त्यांची भावना आहे. त्यासाठी लोकचळवळ उभी करण्याचा वाघ यांचा प्रयत्न असून याच प्रयत्नाचा एक भाग म्हणून शनिवारी सांयकाळी सायंकाळी ५:३० वा. नागपुरातील सीताबर्डी पोलीस ठाण्यात प्रथमोपचार प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Activity of lifeguards for the treatment of accident victims cwb 76 ysh
First published on: 03-06-2023 at 10:38 IST