चंद्रपूर: या जिल्ह्यातील सिमेंट कंपनी पाठोपाठ अदानी उद्योग समूहाने चंद्रपूर जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रात प्रवेश केला आहे. घुग्घुस येथील माऊंट कार्मेल कॅान्व्हेंट उच्च माध्यमिक शाळा अदानी फाऊंडेशनकडे शासनाने हस्तांतरीत केली आहे. या शाळा हस्तांतरणाची जिल्ह्याच्या शैक्षणिक वर्तुळात चर्चा आहे.

या जिल्ह्यातील एसीसी व अल्ट्राटेक सिमेंट कंपनी अदाणी समूहाने घेतली आहे. आता घुग्घुस येथील माऊंट कार्मेल अदानी फाऊंडेशनकडे हस्तांतरीत करण्यासंदर्भात राज्याच्या शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाने २७ सप्टेंबराल एक शासन निर्णय जारी केला.

हे ही वाचा…दादरमधील महिलेची पावणेसहा कोटींची सायबर फसवणूक,सायबर पोलिसांनी आरोपीला पुण्यातून केली अटक

कार्मेल एज्युकेशन सोसायटी, घुग्घुस द्वारा संचालित माऊंट कार्मेल कॅान्व्हेंट उच्च माध्यमिक शाळा, घुग्घुस या इंग्रजी माध्यमाच्या स्वयं अर्थसहाय्यित उच्च माध्यमिक (वर्ग १ ते १२) शाळेचे अदानी फाॅऊडेशन, अहमदाबाद या संस्थेस हस्तांतरीत करण्याचा प्रस्ताव राज्य शासनाच्या विचाराधीन होता. यासंदर्भात ३० जून २०२४ रोजी शिक्षण उपसंचालक नागपूर यांच्याकडे प्रस्ताव पाठविण्यात आला. या प्रस्तावावर अवघ्या तीन महिन्यात राज्य शासनाने निर्णय घेतला आणि शाळा अदानीच्या घशात टाकली. शाळा अदानीकडे हस्तांतरीत करताना शासनाने काही अटी-शर्थी सुद्धा लादल्या. त्या भविष्यात किती पाळल्या जातील, हे येणारा काळच ठरविले. मात्र आता अदानीला या शाळेच्या पटसंख्येत बदल करता येणार नाही. शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे पूर्ण दायित्व अदानी समूहाकडे राहणार आहे. येत्या पंधरा दिवसात अदानी या शाळेचे व्यवस्थापन ताब्यात घ्यायचे आहे.

हे ही वाचा…खासगी गृहप्रकल्पांतील ९१३ सदनिकांची म्हाडाकडून थेट विक्री

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अदानी फाऊंडेशनला माऊंट कार्मेल कॅान्व्हेंटचे व्यवस्थापन राज्य शासनाने दिले. मात्र व्यवस्थापन बदलण्यासंदर्भात शासनाकडे अथवा शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांकडे तक्रारी प्राप्त झाल्यास तसेच व्यवस्थापन बदला संदर्भातली अर्टी आणि शर्थीचा भंग झाल्याचे निदर्शनास आल्यास. येथे कार्यरत कर्मचाऱ्यांच्या सेवाशर्थीचा नवीन संस्थेद्वारा भंग झाल्या हस्तांतरण रद्द करण्याच अधिकार शासनाने आपल्याकडे ठेवले आहे.