नागपूर : कोराडीतील प्रस्तावित १,३२० मेगावॅटच्या वीज प्रकल्पाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, काँग्रेससह विविध पर्यावरणवादी आणि स्वंयसेवी संघटनांचा विरोध आहे. आज (२९ मे) महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने कोराडी औष्णिक वीज केंद्र परिसरात दुपारी १२ वा. जनसुनावणी आयोजित केली आहे. सूनवणीपूर्वी आदित्य ठाकरे यांनी ट्वीट करून सूनवणीच्या स्थळाबाबत शासनाला चिमटा काढला.

आदित्य ठाकरेंनी ट्वीट करून म्हटले की, सामान्यत: अशा मुद्द्यांची सुनावणी जिल्हाधिकारी कार्यालयात किंवा मोठ्या ठिकाणी घेतली जाते. कोराडी पॉवर प्लांटच्या विस्ताराची सुनावणी प्रकल्पाच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये होत आहे. मला आशा आहे की सूचना आणि हरकती मांडू इच्छिणाऱ्या प्रत्येकाला संधी दिली जाईल आणि ऐकण्यासाठी पुरेसा वेळ दिला जाईल. सोबत त्यांनी जनसूनवणीची माहिती देणारे पत्रकही पोस्ट केले आहे.