नागपूर : विदर्भात फक्त पर्यावरणाचीच समस्या नाही तर इतर अनेक विषय आहेत. त्यासाठी लोकांना जागृत करण्याची गरज आहे. या सर्व विषयांवर चर्चा व्हायला हवी. त्यासाठी येत्या जून महिन्याच्या अखेरीस किंवा जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात नागपूर शहरात राष्ट्रीय स्तरावरील पर्यावरण परिषद आयोजित केली जाईल, अशी माहिती माजी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी येथे दिली.

विकास प्रकल्पांसाठी शहरात होणाऱ्या वृक्षतोडीच्या मुद्यावरून ‘सेव्ह अजनी वन’च्या कार्यकर्त्यांनी आदित्य ठाकरे यांची भेट घेतली. उपराजधानीतील इंटरमॉडेल ट्रान्सपोर्ट हबच्या मुद्यावरून या कार्यकर्त्यांनी ठाकरे यांच्यासमोर वृक्षतोडीचा पाढा वाचला. हा प्रकल्प रद्द होत असल्याचे दाखवण्यात येत आहे. प्रत्यक्षात या प्रकल्पाच्या माेबदल्यात इतर ठिकाणी होणाऱ्या प्रकल्पातही अनेक झाडे तोडली जात आहेत. विकासाच्या नावावर वारेमाप वृक्षतोड सुरू असल्याचे या कार्याकर्त्यांनी आदित्य ठाकरे यांच्या निदर्शनास आणून दिले.

हेही वाचा – नागपूर : कॉल वॉशरीजमध्ये मोठा घोटाळा! नागपुरात आदित्य ठाकरेंचा खळबळजनक आरोप

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पर्यावरणाचे अनेक विषय नागपूर आणि परिसरात आहेत. हे सर्व विषय राष्ट्रीय पर्यावरण परिषदेत मांडता येतील. विकासाला विरोध का होत आहे, त्यामागची कारणे काय, यावरही या परिषदेत मंथन होईल, असे ठाकरे म्हणाले.