नागपूर: जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात २५ भारतीयांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर भारताने पाकिस्तानमध्ये ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून दहशतवाद्यांना सडेतोड उत्तर दिले. त्यानंतर प्रथमच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय असलेल्या नागपुरात २५ मे (रविवारी) रोजी रात्री येत आहेत. त्यांच्या संघभूमी असलेल्या नागपुरातील कार्यक्रमाबाबत आपण जाणूण घेऊ या.

जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे २२ एप्रिलला दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीयांसह जगभरात संतापाची लाट पसरली होती. या दहशवाद्यांच्या हल्यात २५ भारतीय आणि एका नेपाळी नागरिकांचा मृत्यू झाला होता. या हल्ल्यात दहशतवाद्यांनी सामान्य पर्यटकांना लक्ष केले होते. त्यांतर भारताने प्रतिशोध घेण्यासाठी पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मिरमधील अतिरेक्यांचे नऊ कॅम्प्स उद्ध्वस्त केले होते. या मोहिमेत भारतीय वायुदलाने अतिरेक्यांच्या नऊ ठिकाणांवर यशस्वी एअर स्ट्राईक करून पहलगाममधल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतला. भारतीय सेनेच्या या खास मोहिमेला ‘ऑपरेशन सिंदूर’ असे नाव देण्यात आले होते.

दरम्यान या मोहिमेदरम्यान दोन्ही देशात प्रचंड तणाव निर्माण झाला होता. काही दिवसांनी दोन्ही देशांत शस्त्रसंधी झाल्यावर स्थिती सामान्य होत आहे. दरम्यान या मोहिमेनंतर सातत्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा आपल्या भाषणांमध्ये यापुढे पाकिस्तानातील दहशतवाद्यांनी काही अनुचित केल्यास त्यांना याहून कडक उत्तर दिले जाणार असल्याचे सांगत आहे. या मोहिमेनंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा प्रथमच संघभूमी असलेल्या नागपुरात येत आहे. त्यानुसार अमित शहा रविवारी (२५ मे) रात्री उशिरा नागपुरात येणार आहे. दुसऱ्या दिवशी सोमवारी (२६ मे) नागपुरातील विविध कार्यक्रमाते ते हजेरी लावून पुढच्या कार्यक्रमासाठी नांदेडला जातील.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अमित शहा यांचे असे राहील कार्यक्रम…

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा २५ मे रोजी रात्री ९.१५ वाजता नागपुरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहचली. येथून ते हाॅटेल रेडिसन ब्लू येथे मुक्काम करतील. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी ११ वाजता ते हाॅटेलमधून निघून ११.१५ वाजताच्या जामठा येथील नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटच्या कार्यक्रमाला हजेरी लावतील. येथून ते हेलिकॅप्टरद्वारे कामठी तालुक्यातील चिचोली येथे नॅशनल फाॅरेन्सिक सायन्स युनिव्हसिटीच्या कायमस्वरूपी कॅम्पसचे भूमिपूजन करतील. तर याचवेळी कायमस्वरूपी कॅम्पस होईस्तोवर वापरल्या जाणाऱ्या तात्पूरच्या कॅम्पसचे उद्घाटनही करतील. येथून ते हेलिकॅप्टरने नागपूर विमानतळावर येऊन येथून पुढच्या कार्यक्रमासाठी नांदेडकडे रवाना होतील.