वाशीम : जिल्ह्यातील कोतवाल पदाच्या ८२ जागेसाठी १ हजार ९४५ अर्ज दाखल झाले होते. त्यासाठी रविवार ३० जुलै रोजी परीक्षा घेऊन लगेच निकाल जाहीर करण्यात आला.मात्र निकाल जाहीर झाल्यानंतर अनेक विद्यार्थ्यांनी परीक्षेवर आक्षेप घेत फेर तपासणी केली असता गुणामध्ये मोठी तफावत आढळून आल्याने अनेक विद्यार्थ्यांनी परीक्षेवर आक्षेप घेतल्याने कोतवाल परीक्षेत सावळा गोंधळ उडाला आहे.

जिल्ह्यात महसूल विभागाच्या वतीने कोतवाल पदाच्या ८२ जागेसाठी रविवार ३० जुलै रोजी परीक्षा घेण्यात आली होती. परीक्षेला १ हजार ९४५ अर्ज आले होते. परीक्षा संपताच त्याच दिवशी निकाल जाहीर करण्यात आला होता. मात्र, निकाल जाहीर होताच अनेक विद्यार्थ्यांनी परीक्षा प्रक्रियेवर आक्षेप घेत तहसीलदारांकडे तक्रारी केल्या होत्या. तर काही विद्यार्थ्यांनी गुणांची फेर तपासणी करण्याची मागणी केली असता मालेगाव तालुक्यातील प्रतीक्षा जीवन सावळे ह्या विद्यार्थिनीला परीक्षेत २६ गुण मिळाले होते. नंतर गुणांची फेर तपासणी केली असता ६० गुण मिळाले.

हेही वाचा >>>मणिपूर हिंसाचार निषेधार्थ धुळ्यात निदर्शने

तर सीमा कांबळे हिला ४४ गुण मिळाले असल्याने फेर तपासणी केली असता ४६ गुण मिळाले. तसेच काही ठिकाणी विद्यार्थ्यांनी परीक्षेवर आक्षेप घेत नाराजी व्यक्त केल्याने कोतवाल परीक्षा वादात सापडली आहे.