नागपूर : विदर्भ वाद्यांनी स्वतंत्र विदर्भ राज्य, वीज दरवाढ रद्द करासह इतर मागण्यांसाठी बुधवारी नागपूरात लाँग मार्च काढला. आंदोलकांना ऊर्जामंत्र्यांच्या निवासस्थानाकडे जाण्यापासून अमरावती मार्गावर पोलिसांनी थांबवल्याने ते आक्रमक झाले. यावेळी आंदोलक- पोलिसांत रेटारेटी झाल्याने तणाव निर्माण झाला होता.

विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या बॅनरखाली आंदोलन झाले. आंदोलनाची सूरवात संविधान चौकातून झाली. येथून आंदोलक व्हेरायटी चौक होत अमरावती मार्गाने उपमुख्यमंत्री व ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या धरमपेठ येथील निवासस्थानाकडे निघाले. पोलिसांनी आंदोलकांना अमरावती मार्गावरील हाॅकी ग्राऊंड परिसरात रोखले. त्यानंतर आंदोलक संतप्त झाले. येथे आंदोलकांनी सरकार व ऊर्जामंत्र्यांच्या विरोधात निदर्शने केले. त्यानंतर आंदोलकांनी पोलिसांनी लावलेले सुरक्षा कठडे ढकलून ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानाकडे जबरन जाण्याचा प्रयत्न केला.

हेही वाचा >>> सत्ताधारी आमदाराचा सरकारविरोधात एल्‍गार; आमदार बच्‍चू कडू शेतकऱ्यांच्‍या मागण्‍यांसाठी आक्रमक

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

परंतु पोलिसांनी त्यांना रोखल्याने येथे दोन्ही गटात रेटारेटी झाली. त्यामुळे तणाव निर्माण झाला होता. शेवटी पोलिसांनी संतप्त आंदोलकांना ताब्यात घेत आपल्या गाडीत भरून नेले. याप्रसंगी आंदोलकांनी कोराडीतील नवीन प्रस्तावित वीज प्रकल्प रद्द करा, विदर्भ राज्य झालेच पाहिजेसह इतरही नारे दिले. या आंदोलनादरम्यान महामार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. आंदोलनात माजी आमदार ॲड. वामनराव चटप, ज्येष्ठ पत्रकार प्रकार पोहरे, रंजना मामर्डे, मुकेश मासुरकर, नरेश निमजे आणि इतरही पदाधिकारी- कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.