भंडारा : जिल्ह्यात मागील १ महिन्यापासून कृषी सेवा केंद्रात उपलब्ध असलेल्या खताची व पॉस मशीनवरील शिल्लक साठा याची पडताळणी मोहीम सुरू आहे. कृषी सेवा केंद्रांना अनुदानित खते पॉस मशीनद्वारे शेतकऱ्यांना विकणे बंधनकारक आहे. तालुक्यात नव्याने रुजू झालेल्या कृषी अधिकारी गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक यांनी केलेल्या तपासणी अहवालानुसार जिल्ह्यातील दोन कृषी सेवा केंद्राचे खत परवाने कायमचे रद्द करण्यात आले तर ९ नऊ कृषी केंद्रांचे खत परवाने काही दिवसांसाठी निलंबित करण्यात आले आहेत.

जे कृषी केंद्र पॉस मशीनद्वारे खत विक्री करणार नाहीत अशा केंद्रावर कारवाई केली जाणार आहे. तसेच शेतकऱ्यांना पक्के बिल न देणे, परवाना दर्शनी भागात न लावणे, खत साठा नोंदवही अद्यावत न ठेवणे, ज्यादा दराने खत विक्री केल्यास परवाने रद्द केले जातील अशा सक्त सूचना जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भंडारा संगीता माने यांनी दिल्या आहेत.

अग्रवाल कृषी केंद्र देवसर्रा, तुमसर, गुप्ता कृषी केंद्र, भुयार पवनी या कृषी केंद्राचे परवाने रद्द करण्यात आले असून नाकडोंगरी कॉपरेटिव्ह राईस मिल, नाकाडोंगरी ९० दिवस शिव कृषी केंद्र, चुल्हाड १५ दिवस, साहिल कृषी केंद्र, गोबरवाही १५ दिवस, देवराम कृषी केंद्र, धानोड ९० दिवस, शुभम कृषी केंद्र, सांबा १५ दिवस, प्रेमपुष्पा कृषी केंद्र वालमाझरी १५ दिवस, बारई ट्रेडर्स, कांद्री ६० दिवस, कृषीयोग कृषी केंद्र, सिहोरा ४५ दिवस, कारेमोरे कृषी केंद्र शहापूर १० दिवस ज्या कृषी केंद्रांचे परवाने रद्द करण्यात आलेली आहे. पुढील काही कालावधीत या कृषी केंद्रांना खत खरेदी विक्रीचे कोणतेही व्यवहार करता येणार नाहीत असे सोनवणे जिल्हा कृषी अधिकारी जिल्हा परिषद यांनी कळविले आहे.