विधानसभाध्यक्ष नाना पटोले यांचा सल्ला
नागपूर : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठचा देशात लौकिक आहे. शेतकऱ्यांना नवीन संशोधनाचा, कृषी तंत्रज्ञानाचा फायदा मिळवून देणे, युवा पिढीला शेतीकडे वळवण्याचे कार्य कृषी विद्यापीठाने करावे, असा सल्ला विधानसभाध्यक्ष नाना पटोले यांनी दिला. डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती स्मारक परिसरात अॅग्रोव्हेट अॅग्रोइंजि मित्र परिवाराच्या वतीने कृषी पदवीधारक विधानसभा सदस्यांसाठी सोमवारी आयोजित सत्कार समारंभात ते बोलत होते. कार्यक्रमाला कृषिमंत्री सुभाष देसाई, आमदार अनिल देशमुख, विद्यापीठाचे कुलगुरू विलास भाले आदी उपस्थित होते.
पटोले म्हणाले की, राज्यात डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे मोठे योगदान आहे. अनेक यशस्वी शेतकरी या विद्यापीठाने दिले आहेत. आता युवा पिढीने अत्याधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करून शेतीकडे वळण्याची गरज आहे. यावेळी विद्यार्थी व शेतकऱ्यांकरिता खुले अध्ययन केंद्र उभारण्याकरिता आर्थिक सहाय्यासाठी अॅग्रोव्हेट अॅग्रोइंजि संघटनेने केलेल्या मागणीबाबत मुख्यमंत्र्यांना कळवणार असल्याचे त्यांनी सांगितले. कृषी पदवीधर आमदारांना एकत्र करण्याचे काम अॅग्रोव्हेट अॅग्रोइंजि संघटनेने के ले असे कृषिमंत्री सुभाष देसाई यावेळी म्हणाले.
सध्या शेती हा राज्यासमोरील गंभीर प्रश्न आहे. शेती आणि शेतकऱ्यांच्या परिस्थितीत बदलासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा अंगीकार के ला पाहिजे. सुशिक्षित शेतकरी, आमदार राज्यातील शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याचा विडा उचलतील, अशी अपेक्षा देसाई यांनी व्यक्त के ली. महाविकास आघाडीचे सरकार महाराष्ट्राला निश्चित विकासाच्या मार्गावर पुढे नेईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त के ला.