अकोला : नोकरी इच्छूक उमेदवारांना खासगी क्षेत्रातील नोकरीच्या संधी उपलब्ध होण्यासाठी कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र व ‘मॉडेल करिअर सेंटर’च्या संयुक्त विद्यमाने शहरात १८ जून रोजी ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ घेतला जाणार आहे.
सुशिक्षित बेरोजगार तरुणांना नोकरीची गरज, तर दुसरीकडे खासगी कंपन्यांना सुद्धा चांगल्या उमेदवारांची आवश्यकता असते. ही गरज ओळखून ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ हा उपक्रम राबविला जात आहे. यामध्ये बेरोजगार तरुण व कंपन्यांसाठी मेळावा घेऊन त्यांची भेट घालून देण्यात येईल. विविध कंपन्यांमधील रिक्त पदांसाठी ही भरती होणार आहे. यामध्ये अकोला येथील ट्रेड कार्ट डिजीटल एकूण रिक्त पदे १२ असून शैक्षणिक पात्रता किमान १० वी, १२ वी किंवा पदवीधर, शोपन्झा सर्व्हिसेस अकोला रिक्त पदे ४९ असून शैक्षणिक पात्रता किमान १० वी, १२ वी किंवा पदवीधर, भारतीय जीवन विमा निगम अकोला येथे रिक्त पदे २० ही केवळ महिलांसाठी आहेत.
त्यासाठी शैक्षणिक पात्रता किमान १२ वी पास, दयाल इंण्डस्ट्रिज बाभुळगांव येथे रिक्त पदे २०, शैक्षणिक पात्रता किमान १२ वी, आयटीआय वाईडिंग ट्रेड किंवा केमिकल अभियांत्रिकी पदवीधर आवश्यकता राहील.
ऑनलाईन सहभाग नोंदवता येणार
या ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’मध्ये ऑनलाईन सहभाग नोंदवण्यासाठी http://www.mahaswayam.gov.in या संकेतस्थळा भेट द्यावी. Employment या टॅबवर क्लिक करावे. Job Seeker हा पर्याय निवडून आपला सेवायोजन नोंदणी क्रमांक किंवा आधार क्रमांक व पासवर्ड वापरून साईन इन करावे. आपल्या होम पेजवरील Job Fair हा पर्याय निवडावा. District मध्ये Akola जिल्हा निवडून Filter बटनवर क्लिक करा नंतर दिनांकीत मेळावा निर्दनास येईल. त्यासमोर असलेलया Action बटनाच्या खाली View व Apply बटन दिसेल. त्यानंतर मेळाव्यास उपस्थित राहणारे उद्योजक व त्यांच्याकडील पदांबाबत माहिती दिसेल. आपल्या पात्रतेनुसार पदाची निवड करुन Apply बटनवर क्लिक करा. । Agree हा पर्याय निवडा. शेवटी Successfully Applied for the Job असा दिसेल. या पद्धतीने ऑनलाईन सहभाग नोंदवता येईल. १८ जून रोजी नोकरी इच्छूक उमेदवारांनी शैक्षणिक कागदपत्रे, पासपोर्ट आकाराच्या छायाचित्रासह जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, प्रशासकीय इमारत, दुसरा माळा येथे स्वखर्चाने उपस्थित राहण्याचे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.