वर्धा: अजित पवार व सहकारी सत्तेच्या वाटेवर भाजपच्या संगतीत जाण्याच्या तयारीत असतांनाच दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर लोभ दाखवीत काँग्रेसचे नगराध्यक्ष शिंदे सेनेकडे धावले आहे.

कारंजा नगरपंचायतीच्या अध्यक्ष तसेच उपाध्यक्ष यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मुंबईत पक्षप्रवेश केला. कारंजा नगरपंचायतीत काँग्रेसचे नऊ तर भाजपचे आठ नगरसेवक आहेत. त्यामुळे बहुमतात काँग्रेसची सत्ता आली होती.

vanchit, Amol Kolhe, court,
अमोल कोल्हे यांच्या उमेदवारी विरोधात ‘वंचित’ न्यायालयात जाणार, जाणून घ्या कारण
Election Commission cautious stance on Narendra Modi Rahul Gandhi statements
भाषणे नेत्यांची; नोटिसा पक्षाध्यक्षांना! मोदी, राहुल यांच्या विधानांबाबत निवडणूक आयोगाची सावध भूमिका
Wrong campaign, gangster type people
कल्याण पूर्वेत गुंड प्रवृत्तीच्या लोकांकडून खासदार शिंदेंचा अपप्रचार, भाजपच्या वरिष्ठांनी दखल घेण्याची जिल्हाध्यक्ष गोपाळ लांडगे यांची मागणी
karan pawar marathi news, jalgaon lok sabha karan pawar marathi news
भाजपचे माजी नगराध्यक्ष करण पवार यांना पक्षप्रवेशानंतर लगेचच ठाकरे गटाची जळगावमधून उमेदवारी

हेही वाचा… नागपूर: वन विभागाच्या पदभरतीमध्ये गैरप्रकार…या क्रमांकावर करा तक्रार

नुकत्याच झालेल्या बाजार समितीच्या निवडणुकीतही काँग्रेसला मोठे यश मिळाले होते. माजी आमदार अमर काळे यांच्या नेतृत्वात या तालुक्यात काँग्रेसने डंका वाजविला. मात्र पक्षांतर झाल्याने त्यांच्या नेतृत्वालाच आव्हान देण्यात आले आहे. नगराध्यक्ष स्वाती भिलकर, उपाध्यक्ष भगवान बोवाडे तसेच सदस्य संजय मस्की, विशाल इंगळे, राजेंद्र लाडके, हेमंत बन्नगरे, निता मिश्रा, मधुबाला दुधकवडे कमलेश कठाने व स्वीकृत सदस्य नितीन दर्यापुरकर यांनी प्रवेश घेतला आहे.

हेही वाचा… चंद्रपूर: गोंडपिंपरीचा रितेश बनला कस्टम विभागात अधिकारी

मुख्यमंत्र्यांचे खास समजल्या जाणारे किरण पांडव यांनी यात मोलाची भूमिका पार पाडल्याचे म्हटल्या जाते. काँग्रेस नेते अमर काळे म्हणाले की बस अपघाताची मोठी दुर्घटना घडली त्याच दिवशी हा सोहळा झाला. हे वाईटच. मुख्यमंत्र्यांनी किमान संवेदनशीलता दाखविणे अपेक्षित होते. असो मला पक्षांतर झाल्याने फरक पडणार नाही. जे गेलेत त्यांनी प्रथम राजीनामा देत परत निवडून येण्याची हिंमत दाखविणे अपेक्षित होते. आता नव्याने कारंज्यात पक्ष बांधणी करू. काँग्रेस कार्यकर्ते पक्षातच आहे. परत झेंडा फडकवू, असा विश्वास काळे यांनी व्यक्त केला.