बुलढाणा : संपूर्ण राज्याप्रमाणेच बुलढाणा जिल्ह्याचेही सर्वोच्च न्यायालयाच्या आज दुपारी येणाऱ्या सत्ता संघर्षांच्या निकालाकडे लक्ष लागले आहे. यातही शिंदे गटाचा गड असलेल्या मेहकर मतदारसंघातील राहिवासीयांचे याकडे जास्तच लक्ष असून शिंदे गट समर्थकांच्या हृदयाचे ठोके वाढले आहे.
याला तसे खास कारणही आहे .

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ठाकरे गटाकडून दाखल करण्यात आलेल्या १६ आमदारांच्या यादीत मेहकरचे आमदार डॉ. संजय रायमूलकर यांचाही समावेश आहे. सेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीत रायमूलकर गुवाहाटी व्हाया सुरत सहभागी झाले. त्यांचे नाव मोजक्या १६ आमदारांच्या यादीत झळकल्याने ते चर्चेत आले होते. आजही ते प्रकाश झोतात आले आहे. आज सत्तासंघर्षसोबतच त्यांचेही भवितव्य ठरणार आहे. काही वेळातच हा निकाल लागणार आहे. सर्वांचे टेंशन वाढले असताना आमदार मात्र आज मेहकर मतदारसंघातच आहे.

हेही वाचा – अमरावती : बाजार समित्‍यांच्या निवडणुकीनंतर आता सभापतीपदासाठी मोर्चेबांधणी; कोणाच्या गळ्यात पडणार माळ?

शाखा प्रमुखपासून आपली राजकीय कारकीर्द सुरू करणारे रायमूलकर यांनी दमदार कामगिरी व निष्ठा या जोरावर मेहकर तालुका प्रमुख, बाजार समिती सभापतीपर्यंत मजल मारली. यानंतर २००९ मध्ये मेहकर अनुसूचित जातिकरिता राखीव झाला. रायमूलकर याना उमेदवारी मिळाली आणि ते सुमारे ३८ हजारांच्या लिडने विजयी झाले. २०१४ च्या मोदी लाटेत त्यांचा लीड ४५ हजारावर गेला. २०१९ मध्ये विक्रमी ६४ हजारांच्या फरकाने लढत जिंकत आमदारकीची हॅट्ट्रिक केली. खासदार प्रतापराव जाधव यांचे विश्वासू अशी ओळख असलेल्या, या मवाळ, अजूनही जमिनीवर असलेल्या या नेत्याला सत्तातरानंतर पंचायत राज समितीचे अध्यक्षपद मिळाले आहे. मंत्रीपदाची चर्चा झाली, पण लाल दिवा त्यांच्यापासून दूरच राहिले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Along with the power struggle the political future of mla raimulkar is also decided scm 61 ssb
First published on: 11-05-2023 at 12:30 IST