नागपूर : मागील चार महिन्यापासून बंद असलेली अंबाझरी मार्गावरील वाहतूक हिंगणा आणि विद्यापीठाकडे जाणाऱ्या मार्गावरील अंबाझरी टी-पाईंट ते गजानन मंदिर दरम्यानच्या अंबाझरी पुलाचे काम पूर्ण झाले असून तो वाहतुकीसाठी लवकरच खुला होणार आहे.

गेल्यावर्षी मुसळधार पावसामुळे अंबाझरी तलावातून अचानक विसर्ग वाढला या पूरस्थितीला स्वामी विवेकानंद स्मारक, नाग नदीवरील अतिक्रमण आणि विसर्गाचे पाणी वाहून नेणारा छोटा पूल कारणीभूत असल्याची बाब समोर आली. त्यामुळे चारपदरी उंच पूल उभारण्यात आला आहे. लवकरच तो वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे वरिष्ठ अभियंता संदीप शेंडे यांनी ‘लोकसत्ता’ला दिली. उच्च न्यायालयाच्या हस्तक्षेपानंतर प्रशासनाने वेगाने पुलाचे काम केले. प्रारंभी ६ ऑक्टोबरला एका बाजूने हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार होता. परंतु, नंतर दोन्ही बाजूने वाहतूक एकाचवेळेस सुरू करण्याचे ठरले. या पुलाचे काम झाले आहे, परंतु या पुलाला जोडणारा रास्ता सिमेंट काक्रिटचा करण्यासाठी वेळ लागणार आहे. त्यामुळे थाटात उदघाटन समारंभ न करता पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे. उद्या, शुक्रवारी (११ ऑक्टोबर) या पुलावरून वाहतूक सुरू करण्यात येत आहे.

हे ही वाचा…लोकजागर: वादाची ‘कविता’!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

चाचणी पूर्ण

पुलाची चाचणी पूर्ण झाली आहे. या पुलापासून दोन्ही बाजूला सिमेंट रस्ता तयार करण्यात येणार आहे. हे काम साधारणत: एक महिन्याने केले जाईल. नवरात्र, दसरा आणि धम्मचक्र प्रवर्तन दिनामुळे रस्त्यावर वर्दळ अधिक असते. परिणामी, वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून ११ ऑक्टोबरला या पुलावरून वाहतूक सुरू करण्यात येत आहे. याविषयीचे पत्र शहर वाहतूक पोलिसांना दिले आहे, असे वरिष्ठ अभियंता शेंडे यांनी सांगितले.