scorecardresearch

प्रजासत्ताक दिनी तीन शाळकरी मुले पोहायला गेले अन…

काल गुरुवारी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास मुले पोहायला गेली होती. खड्डयाजवळ मुलांचे कपडे, चपला, जोडे होते. त्यावरून ही घटना उघडकीस आली.

Drowned-death
(प्रातिनिधिक छायाचित्र)

चंद्रपूर : गुरुवारी प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम आटोपून सायंकाळी तीन शाळेकरी मित्र गडचांदूर शहरालगतच्या अल्ट्राटेक सिमेंट कंपनीने खोदलेल्या एका खोल खड्डयात पोहण्यासाठी गेले. अंधारात पाण्याचा अंदाज न आल्याने या तीन शाळकरी मुलांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली. आज, शुक्रवारी सकाळी ही घटना उघडकीस आल्याने एकाच खळबळ उडाली.

हेही वाचा – नागपूर : प्रसिद्ध दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्यावर कारवाई करा, लहू सेना आक्रमक

हेही वाचा – गडचिरोली : गोंडवाना विद्यापीठातील नामकरण प्रकरण आणखी तापणार, आदिवासी कार्यकर्ते वसंंतराव कुलसंगे यांचे बेमुदत उपोषण सुरू

काल गुरुवारी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास मुले पोहायला गेली होती. खड्डयाजवळ मुलांचे कपडे, चपला, जोडे होते. त्यावरून ही घटना उघडकीस आली. दर्शन बच्चा शंकर, पारस गौरदिपे व अर्जून सिंह अशी मृतांची नावे आहे. तिघेही अल्ट्राटेक कंपनी वसाहतीतील कर्मचाऱ्यांची मुले आहे.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 27-01-2023 at 12:21 IST
ताज्या बातम्या