केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून नागपूरच्या फुटाळा तलावावर साकारलेला म्‍युझिकल फाउंटन व लाईट शो (संगीत कारंजी) शुक्रवारी रात्री साडेसात वाजता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा बघणार आहेत. अमित शहा यांचे शुक्रवारी १७ फेब्रुवारीला रात्री नागपूरमध्ये आगमन होत आहे. त्‍यानिम‍ित्‍त रात्री ७.३० वा. फुटाळा येथे म्‍युझिकल फाउंटन आणि लाईट शो आयोजित करण्यात आला आहे. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्‍यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, आ. प्रवीण दटके आदी उपस्‍थ‍िती राहणार आहेत.

हेही वाचा-  ‘पांढरे सोने’ घेऊन चोरटे फरार, शेतकरी मात्र बेजार!

या म्‍युझिकल फाउंटेन शोसाठी जगप्रसिद्ध संगीतकार ए. आर. रेहमान यांचे संगीत लाभलेले असून बीग बी अम‍िताभ बच्‍चन, प्रख्‍यात गीतकार-दिग्‍दर्शक गुलजार व लोकप्रिय अभिनेते नाना पाटेकर यांची कॉमेंट्री आहे. विशेष शोच्या प्रवेश पत्रिका नितीन गडकरी यांचे जनसंपर्क कार्यालय, सावरकर नगर, ऑरेंज सिटी हॉस्पिटल जवळ, खामला, नागपूर येथून शुक्रवारी सकाळी १२ वाजेपासून प्राप्‍त करता येतील.