अमरावती : गेल्‍या अनेक महिन्‍यांपासून खासदार नवनीत राणा यांच्‍या भाजप प्रवेशाची चर्चा सुरू होती. पण, बुधवारी रात्री नाट्यमय घडामोडींमध्‍ये नवनीत राणा यांना भाजपकडून आधी उमेदवारी जाहीर झाली. नंतर त्‍यांनी युवा स्‍वाभिमान पक्षाच्‍या सदस्‍यत्‍वाचा राजीनामा त्‍यांचे पती रवी राणांकडे सोपवला. त्‍यानंतर नागपुरात भाजपचे प्रदेशाध्‍यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्‍या उपस्थितीत भाजप प्रवेशाचा सोपस्‍कार पार पडला. भाजपवर हा उलट्या प्रवासाचा प्रसंग का ओढवला, याची चर्चा आता रंगली आहे.

अमरावती लोकसभा मतदार संघातून भाजपची उमेदवारी गृहीत धरून नवनीत राणा यांनी गेल्‍या अनेक महिन्‍यांपासून प्रचाराला सुरूवात केली होती. पण, त्‍यांच्‍या पक्षप्रवेशाचा मुहूर्त सापडत नव्‍हता. मध्‍यंतरीच्‍या काळात नवनीत राणा यांनी प्रचाररथ तयार केले. त्‍यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांच्‍यापासून महायुतीच्‍या सर्व नेत्‍यांच्‍या तसबिरी झळकल्‍या होत्‍या. राणांचा पक्षप्रवेश झालेला नसताना भाजपच्‍या नेत्‍यांची नावे वापरण्‍याचा हक्‍क कुणी दिला, अशा तक्रारी समोर आल्‍यावर प्रचाररथाची चाके थांबविण्‍यात आली.

Sangli Lok Sabha, Chandrahar Patil,
सांगली : प्रतिस्पर्धी उमेदवारांकडून एकमेकांना शुभेच्छा
19 candidates filed nominations for Sangli Lok Sabha elections on the last day
सांगली : अखेरच्या दिवशी १९ जणांची उमेदवारी दाखल
Madha lok sabha seat, Dhairyasheel Mohite Patil, Join NCP sharad pawar group, Likely to Contest Elections, lok sabha 2024, bjp, ranjeet singh naik nimbalkar, maharashtra politics,
शरद पवार-धैर्यशील मोहिते पाटील भेटीनंतरही माढ्याची उमेदवारी गुलदस्त्यातच
ajit pawar and supriya sule
“संसदेत भाषणं करून मतदारसंघाचे प्रश्न सुटत नाहीत”, अजित पवारांचे सुप्रिया सुळेंवर टीकास्र; म्हणाले, “माझी पट्टी लागली तर…”

हेही वाचा : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी खासदारकीची उमेदवारी का नाकारली?

पण, या दरम्‍यान नवनीत राणा यांचे कट्टर विरोधक आमदार बच्‍चू कडू, शिवसेना शिंदे गटाचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांच्‍या तीव्र विरोधामुळे वातावरण बदलून गेले. त्‍यातच भाजपमधील स्‍थानिक नेत्‍यांनी राणांच्‍या उमेदवारीला विरोध दर्शवला. राणा दाम्‍पत्‍य हे भाजपच्‍या पदाधिकाऱ्यांना विश्‍वासात घेत नसल्‍याचे सांगून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्‍यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्‍यासमोर मंगळवारी तक्रारींचा पाढा वाचला. उभय नेत्‍यांनी भाजपच्‍या पदाधिकाऱ्यांची समजूत काढली. राणांच्‍या भाजप प्रवेशाची वाट बिकट होत असल्‍याचे चित्र रंगवले जात असताना अकस्‍मात बुधवारी भाजपने नवनीत राणा यांना उमेदवारी जाहीर केली. पक्षाच्‍या सदस्‍यही नसलेल्‍या नवनीत राणा यांना भाजपची उमेदवारी मिळाली, याचे आश्‍चर्य कुणाला वाटले नाही, पण घडलेल्‍या घटनाक्रमावरून हा प्रकार सामान्‍य नव्‍हे, अशी प्रतिक्रिया राजकीय वर्तुळात उमटली.

हेही वाचा :लोकजागर : नानांचा ‘आपटीबार’!

नवनीत राणा यांनी भाजपमध्‍ये प्रवेश केला असला, तरी आमदार रवी राणा यांच्‍या खांद्यावर युवा स्‍वाभिमान पक्षाचा दुपट्टा कायम होता. सर्वोच्‍च न्‍यायालयात नवनीत राणा यांच्‍या जात प्रमाणपत्राबद्दल निकाल प्रलंबित आहे. अजून न्‍यायालयाचा निकाल लागलेला नाही, असे सांगून चंद्रशेखर बावनकुळे यांनी वेळ मारून नेली असली, तरी राणा यांच्‍यावर न्‍यायालयाच्‍या निर्णयाची टांगती तलवार आहे. उच्‍च न्‍यायालयाने सोलापूरचे भाजपचे खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरवत रद्द करण्याचा जात पडताळणी समितीने घेतलेला निर्णय रद्द करून पुन्हा एकदा जात पडताळणी करण्याचे आदेश दिले. हे प्रकरण सध्‍या न्यायप्रविष्ट आहे. तरी त्यांच्या या प्रकरणामुळे त्यांच्या राजकीय प्रवासाला ब्रेक लागला. त्‍यांना पुन्‍हा उमेदवारी मिळाली नाही. दुसरीकडे, नवनीत राणा यांच्‍या बाबतीत भाजपने दुसरा न्‍याय केला. भाजपवर ही वेळ का आली, हा प्रश्‍न त्‍यामुळे चर्चेत आला आहे.