नागपूर : विरोधी पक्षांच्या नेत्यांबद्दल द्वेष आणि घृणा निर्माण होईल, अशा प्रकारे कार्यकर्त्यांची जडणघडण होत आहे की काय, असा प्रश्न उपस्थित व्हावा, अशी स्थिती निर्माण झाली आहे. राजकीय नेत्यांच्या वक्तव्याने हे कार्यकर्ते भडकतात आणि टोकाचे पाऊल उचलतात. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना ठार मारण्याची मिळालेली धमकी हा त्याचाच परिपाक आहे. पण, शरद पवार यांच्या बाबत २०११ मध्ये धमकी नव्हे, तर प्रत्यक्ष कृतीच घडली. जाणून घ्या त्या दिवशी नेमके काय घडले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना अमरावती येथील एका युवकाने ठार मारण्याची धमकी दिल्याचे प्रकरण समोर आले. तो युवक भाजपाशी संबंधित असल्याचा आरोप होत आहे. त्यासंदर्भातील छायाचित्रदेखील समाजमाध्यमांवर प्रकाशित झाले आहेत. आरोपी युवकाचे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्यासोबत छायाचित्र आहे. अशाप्रकारे धमकी देणे किंवा नेत्याविषयी राग मनात साठवून ठेवणे आणि संधी मिळताच ती प्रत्यक्षात उतरणे असले प्रकारही घडले आहेत.

हेही वाचा – नागपूर : कोराडीतील प्रस्तावित १,३२० मेगावॅटच्या प्रकल्पाविरोधात जय विदर्भ पार्टी मैदानात

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शरद पवार यांच्यावर २०११ मध्ये दिल्लीत एका युवकाने हल्ला केला होता. त्यावेळी ते केंद्रात कृषिमंत्री होते. नवी दिल्ली महापालिका केंद्रात हरविंदर सिंग या हल्लेखोराने पवार यांना थापड मारली होती. ते साहित्यिक समारंभ आटोपून आवारातून बाहेर पडत असताना त्यांच्यावर हल्ला झाला.