माझी कमाई ही देवेंद्र फडणवीसांपेक्षा अधिक आहे, असं विधान राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी केलं आहे. अमृता फडणवीस यांनी सामाजिक कार्य हीच देवेंद्र फडणवीस यांची कमाई असल्याचंही म्हटलंय. अभिव्यक्ती वैदर्भीय लेखिका संस्थेतर्फे मंगळवारी आयोजित अभिरूप न्यायालयात अमृता यांनी उत्तरे दिली.

नागपूरमध्ये अभिरूप न्यायालय कार्यक्रमामध्ये अमृता यांनी एक विशेष मुलाखत दिली. न्यायमूर्ती म्हणून अ‍ॅड. कुमकुम सिरपूरकर यांनी तर वकील म्हणून अजेय गंपावार आणि लिपिक म्हणून रश्मी पदवाड-मदनकर यांनी या अनोख्या न्यायालयाचं काम पाहिलं. त्यावेळी मुलाखतीदरम्यान अमृता यांना त्यांच्या प्रोफेशनसंदर्भात प्रश्न विचारण्यात आला. न्यायालयामध्ये आरोपीच्या पिंजऱ्यात उभं राहून आपल्या सार्वजनिक आयुष्यासंदर्भातील प्रश्नांना उत्तरं देण्याचा फॉरमॅट असलेल्या या कार्यक्रमात अमृता फडणवीस यांनी अनेक प्रश्नांना दिलखुलासपणे उत्तरं दिली.

अभिरूप न्यायालयातील प्रश्नोत्तरांदरम्यान, “आमृताजी तुमच्या आईंनी, सासूबाईंनी तुम्ही करियरिस्ट आहात म्हणून सांगितलं. तर माझा पुढचा आरोप असं आहे की देवेंद्रजींनी एकदा म्हटलं होतं की माझ्यापेक्षा जास्त पैसे तर अमृता कमावते. खरं आहे का हे?” असं मुलाखत घेणाऱ्या अजेय गंपावार यांनी विचारलं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या प्रश्नाला उत्तर देताना अमृता फडणवीस यांनी आपली कमाई ही पतीपेक्षा अधिक असल्याचं मान्य केलं. “हो खरं आहे. कारण त्यांनी कधी पैसे कमवलेच नाही जीवनात. त्यांनी फक्त लोकसेवा केली,” असं अमृता यांनी या प्रश्नाला उत्तर देताना म्हटलं.