सध्या देशात सर्वत्र नवरात्री उत्सव आनंदात साजरा केला जात आहे. अनेक ठिकाणी गरबा कार्यक्रमाचं आयोजन केलं जात आहे. या कार्यक्रमांना भरभरून प्रतिसाद मिळत आहेत. राजकीय मंडळीही गरबा कार्यक्रमाला उपस्थिती लावत गरबा खेळण्याचा आनंद लुटत आहेत. दरम्यान, शनिवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी नागपुरातील एका गरबा कार्यक्रमाला उपस्थिती लावली.

यावेळी अमृता फडणवीस यांनी गरबा खेळण्याचा आनंद लुटला. तसेच महाराष्ट्रातील सर्वांना त्यांनी नवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमात त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी खास उखाणाही घेतला आहे. त्यांनी घेतलेल्या उखाण्याची सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे.

हेही वाचा- “माझे काका मला चांगल्याप्रकारे ओळखत असावेत, म्हणून…”, अजित पवारांबद्दल रोहित पवारांचं सूचक विधान

कार्यक्रमस्थळी प्रतिक्रिया देताना अमृता फडणवीस म्हणाल्या, “नवरात्रीनिमित्त लोकांमध्ये फार उत्साह आहे. माझ्याकडून सर्वांना नवरात्री आणि विजयादशमीच्या खूप शुभेच्छा. मी स्वत:च्या आनंदासाठी गरबा कार्यक्रमात सहभागी झाली आहे. आईचरणी हेच साकडं घालते की, आपला महाराष्ट्र सुजलाम् सुफलाम राहो, सर्व क्षेत्रात महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर येवो. आपल्या नागपुरात असुविधा न येवो, अशी प्रार्थना करते.”

हेही वाचा- “देवेंद्र फडणवीस खोटं बोलतायत”; रोहित पवारांचं स्पष्ट विधान, म्हणाले, “त्यांनी माफी…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, अमृता फडणवीस यांनी पती व महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी खास उखाणा घेतला आहे. “मी फिरते मळ्यात, नजर माझी तळ्यात… देवेंद्रजी सारखे रत्न पडले माझ्या गळ्यात…” असा उखाणा अमृता फडणवीसांनी घेतला आहे. त्यांच्या या उखाण्याची सोशल मीडियावर चर्चा आहे.