वाशीम : साहित्य घेण्यासाठी दुचाकीने जात असलेल्या जवानाला कारंजा मंगरूळपीर मार्गावरील पोटी फाट्यावर ट्रकने धडक दिली. यामध्ये योगेश सुनील पाडोळे यांचा मृत्यू झाला. ही घटना १६ जून रोजी रात्री घडली. योगेश सुनील आडोळे दोनच दिवसांपूर्वी सुट्टीवर गावी आले होते. मात्र, अपघातात त्यांचा मृत्यू झाल्याने पोटी गावात शोककळा पसरली आहे.

सुनील हे २०१९ मध्ये सैन्य दलात दाखल झाले होते. जम्मू काश्मीरमधील राजुरी येथे सेवेत होते. महिनाभराची सुट्टी घेऊन योगेश दोन दिवसांपूर्वीच गावी आले होते. १६ जून रोजी दुपारी मित्रांसोबत एक लग्न समारंभ आटोपून सायंकाळी गावी परतले. परंतु रात्री काही साहित्य घेण्यासाठी दुचाकीने जात असताना मंगरुळपीरकडून कारंजाकडे जाणाऱ्या भरधाव ट्रकने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. यामध्ये जबर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

हेही वाचा – ड्रायव्हिंग लायसन्सवर आता ‘लेझर प्रिंट’; माहिती पुसट होण्याची समस्या निकाली निघणार

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

योगेश आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. योगेश यांच्या घरची परिस्थिती जेमतेमच असून त्यांच्या पगारावरच घर चालत होते. त्यांच्या पश्चात घरी आई एकटीच असून लहान बहणीचे लग्न झाले आहे.