वर्धा : शालेय शिक्षण विभागाने एक महत्त्वपूर्ण निर्णय आज घेतला. पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी कोणीच नापास होणार नाही ही संकल्पना बाद करण्यात आली आहे.

पाचवीच्या विद्यार्थ्यांना वार्षिक परीक्षेत प्रत्येक परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी अठरा गुण आवश्यक करण्यात आले आहे. तर आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी २१ गुण आवश्यक ठरणार आहे. विद्यार्थी नापास झाल्यास त्याला त्याच वर्गात ठेवले जाणार आहे. याची अंमलबजावणी चालू शैक्षणिक वर्षापासून केली जाणार आहे. शिक्षण हक्क कायद्यात बदल झाल्याने विद्यार्थी नापास होणार नाही, ही संकल्पना बाद करण्यात आली आहे.

Supreme Court Verdict on Madrasa Education Act
UP Madarsa Act: मदरसा शिक्षण मंडळ कायदा घटनात्मक; सर्वोच्च न्यायालयाचा योगी आदित्यनाथ सरकारला झटका, उच्च न्यायालयाचा निकाल फेटाळला
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले…
Multi-candidate contests on most seats in Nashik 196 candidates in 15 constituencies
नाशिकमध्ये बहुसंख्य जागांवर बहुरंगी लढती; १५ मतदारसंघात १९६ उमेदवार
candidates Bhayander, Rebellion BJP,
भाईंदरमध्ये १७ उमेदवार रिंगणात, ६ जणांची माघार, भाजपमधील बंडखोरी शमली, गीता जैन यांना ‘फलंदाज’ चिन्ह
Success Story Of Nitin Shakya In Marathi
Success Story Of Nitin Shakya : डॉक्टर ते आयएएस अधिकारी, झोपडपट्टीतील मुलांची सेवा करताना मनात जागं झालं स्वप्न; जाणून घ्या नितीन शाक्य यांची गोष्ट
BJP state president Bawankule warning about withdrawing BJP's rebel candidate application
अर्ज मागे घेतले नाही तर पक्षाचे दरवाजे बंद; भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंचा बंडखोरांना इशारा
halba community candidates in three constituencies in nagpur against bjp and congress
हलबा समाजाच्या उमेदवारीचा फटका कुणाला? भाजप, काँग्रेसवर नाराजी तीन मतदारसंघात उमेदवार देणार 
Anis Ahmed, Anis Ahmed Congress, Anis Ahmed latest news, Anis Ahmed marathi news,
अर्ज भरण्याची वेळ चुकवणारे अनिस अहमद पुन्हा काँग्रेसमध्ये

हेही वाचा – शिंदे-फडणवीस शेतकऱ्यांच्या बांधावर; विरोधकांच्या टीकेनंतर बाधितांना सरसकट मदत देण्याची ग्वाही

पाचवी, आठवी इयत्तेत असणाऱ्या विद्यार्थ्यांची प्रत्येक विषयाची परीक्षा घेवून परीक्षा आटोपल्यावर प्रत्येक विषयात तपासणी होणार. अपेक्षित अध्ययन संपादणूक त्यांनी प्राप्त केले आहे अथवा नाही याची खात्री केल्या जाणार आहे. वार्षिक परीक्षेत नापास झाल्यास विद्यार्थ्यास पुन्हा परीक्षा देण्याची संधी मिळणार. विद्यार्थ्यांना नियमित अभ्यासाची सवय लावणे आणि पुढील शैक्षणिक आव्हानांना व स्पर्धा परीक्षांना सामोरे जाण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे म्हटल्या जाते.

पाचवीच्या विद्यार्थ्यांची दहा गुणांची प्रात्यक्षिक किंवा तोंडी परीक्षा तर चाळीस गुणांची लेखी अशी पन्नास गुणांची परीक्षा होणार. तर आठवीत साठ गुणांची परीक्षा घेतली जाणार. पाचवीच्या परीक्षेत प्रथम, द्वितीय व तृतीय भाषा, गणित, परिसर अभ्यास या विषयांचा समावेश राहील. तर आठवीच्या परीक्षेत प्रथम, द्वितीय, तृतीय भाषा, गणित, विज्ञान तसेच सामाजिक शास्त्र या विषयांचा समावेश करण्यात आला आहे.

हेही वाचा – सत्ताधारी आमदारांना ४० कोटींचा निधी; विरोधी पक्षांचे आमदार मात्र वंचित

एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात वार्षिक परीक्षा घेण्याचे नियोजन आहे. वार्षिक परीक्षेत नापास झाल्यास दोन महिन्यांनी त्याची पुन्हा परीक्षा घेतली जाईल. उत्तीर्ण झाल्यास पुढील वर्गात प्रवेश घेण्यास विद्यार्थी पात्र ठरणार. मात्र नापास झाल्यास त्याच वर्गात ठेवल्या जाणार आहे.