लोकसत्ता टीम

अमरावती: वरुड तालुक्यातील एकलविहीर ‎गावातील एका विहिरीत एक अनोळखी मृतदेह ‎आढळून आला आहे. या मृतदेहाला शीर ‎आणि हात नाही. तसेच‎ पोत्यात केवळ शरीराचा सांगाडाच ‎शिल्लक राहिला आहे. त्यामुळे हत्‍येनंतर शीर आणि हात कापून मृतदेह ‎‎विहिरीत टाकल्याच्या निष्कर्षाप्रत‎ पोलिस पोहोचले आहेत. त्यामुळे वरुड पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध हत्‍येचा‎ गुन्हा दाखल केला आहे.‎

two Children Drown While Swimming, Surya River, palghar taluka, One Rescued, two dead Body Found , two Children Drown in Surya River, palghar news, Drown news,
सूर्या नदीत दोघांचा बुडून मृत्यू; एकाला वाचवण्यात यश
environmentalist initiative to fill dry water bodies for wildlife
उरण : वाढल्या उन्हाच्या झळा, वन्यजीवांसाठी भरला पाण्याचा तळा
Worker dies due to suffocation in sewage tank
वसई : सांडपाण्याच्या टाकीत गुदमरून कामगाराचा मृत्यू
पाणीपुरवठ्याच्या तक्रारींची ‘संततधार’, पुणेकरांकडून चार दिवसांत ४०० तक्रारी

एकलविहीर गावातील एका‎ शेतातील विहिरीच्या पाण्याची‎ दुर्गंधी आली. ही बाब‎ शेतमालकाच्या लक्षात आल्यामुळे‎ त्यांनी विहिरीच्या पाण्याचा उपसा सुरू‎ केला. विहिरीचे संपूर्ण पाणी‎ उपसल्यानंतर बुडात दोन पोते दिसले.‎ त्यामधून दुर्गंधी येत होती. म्हणून पोते‎ बाहेर काढले. त्यावेळी एका पोत्यात‎ मानवी मृतदेह (सांगडासदृश) तर‎ दुसऱ्या पोत्यात दगड होते. दोन्ही पोते‎ एकमेकांना बांधले होते. यावरुन‎ आरोपींनी हत्‍या केल्यानंतर मृतदेह‎ विहिरीतील पाण्यावर तरंगायला नको,‎ म्हणून दगड बांधल्याचे समोर आले‎ आहे.

हेही वाचा… भंडारा : उधारीच्या पैशाचे कारण, तरुणाचे केले अपहरण

मृतदेहावर मास शिल्लक नाही,‎ शीर नाही, हात नाही त्यामुळे ओळख‎ पटवणे पोलिसांसाठी आव्हानात्मक‎ ठरले आहे. मात्र अंगात निळ्या रंगाची‎ जीन पॅन्ट असून, तो तरुणाचा मृतदेह‎ असावा, असा प्राथमिक अंदाज‎ पोलिसांनी वर्तवला आहे. त्या आधारे‎ वरुड पोलिसांनी अज्ञात‎ मारेकऱ्यांविरुद्ध हत्‍या करणे तसेच‎ पुरावा नष्ट करणे या कलमान्वये गुन्हा‎ दाखल केला आहे.‎

हेही वाचा… नागपूर: अभियांत्रिकीच्या विद्यार्थिनीवर चहाटपरी चालकाचा बलात्कार

प्रथमदर्शनी हे कृत्य एक‎ महिन्यापूर्वीचे असावे, असा अंदाज‎ आहे. हा‎ पूर्वनियोजीत कट असल्याचे पोलिसांचे म्‍हणणे आहे.