अमरावती : अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ करावी, अंगणवाडी सेविकांना शासकीय तृतीय श्रेणी व मदतनीसांना चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांचा दर्जा मिळावा, यासह इतर मागण्यांसाठी अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्‍या (सीटू) वतीने मंगळवारी महिला व बालकल्‍याण विभागाच्‍या उपायुक्‍त कार्यालयावर मोर्चा काढण्‍यात आला.

अंगणवाडी शहरी प्रकल्प व ग्रामीण क्षेत्रातील सेविका व मदतनीस यांनी गेल्‍या ८ डिसेंबर रोजी मोर्चा काढला होता. त्‍यानंतर १५ डिसेंबर रोजी नागपूर येथे विधिमंडळ अधिवेशनादरम्‍यान मोर्चाचे आयोजन करण्‍यात आले होते.  गेल्‍या ४ डिसेंबर पासून एकात्मिक बालविकास अधिकारी कार्यालया समोर धरणे आंदोलन सुरुच आहे. तरी सरकारचे अंगनवाडी कर्मचाऱ्यांच्‍या मागण्यांकडे दुर्लक्षच आहे, असा आंदोलकांचा आरोप आहे.

हेही वाचा >>>धवनकर प्रकरणातील तक्रार मागे घेणाऱ्यांकडून वेतनाचे पैसे वसूल करावे, मध्यस्थी करणाऱ्यांबाबत विद्यापीठात चर्चा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अंगनवाडी कर्मचारी सेविका यांना किमान २६ हजार व मदतनिसांना १८ हजार रुपये दरमहा मानधन देण्‍यात यावे, महागाई निर्देशांकांनुसार महागाई भत्ता देण्‍यात यावा, सरकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा द्यावा, पेन्‍शन योजना लागू करावी, अशा मोर्चेकऱ्यांच्‍या मागण्‍या आहेत. सभेला सीटू चे जिल्‍हाध्‍यक्ष सुभाष पांडे, अंगणवाडी कर्मचारी संघटनेचे जिल्‍हाध्‍यक्ष रमेश सोनुले यांनी संबोधित केले.

मोर्चाचे नेतृत्‍व रमेश सोनुले, पद्मा गजभिये, रेखा वानखडे, आशा वैद्य, रेहाना यास्मिन, निलू मेश्राम, कल्‍पना रोडगे, संघमित्र जांभूळकर, ऋषाली डवरे, इंद्रायणी आठवले, अरूणा नितनवरे, ऋषाली गडलिंगकर, देवता बावनगडे, चंदा माहुरे, शारदा कांबळे, वहिदा कलाम, प्रतिभा कांबळे, संध्‍या खांडेकर, राजेंद्र भांबोरे, सुनील देशमुख यांनी केले