चंद्रपूर : अनिल देशमुख सगळ्या मिटींगला माझ्यासोबत हजर होते. अनिल देशमुखांनी मंत्रिमंडळात स्थान पाहिजे, असं सांगितलं होतं. मात्र, भाजपनं अनिल देशमुखांच्या नावाला नकार दिला होता. त्यांचं नाव कमी झाल्यानं ते आमच्यासोबत आले नाहीत, असे अजित पवार आज रायगड येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अधिवेशन म्हणाले होते.

हेही वाचा – गोंदिया : बिरसी विमानतळावरून पहिल्या विमानाने घेतली झेप

हेही वाचा – अकोला : घटस्फोटानंतरही पतीकडून त्रास; महिलेची सहा वर्षीय मुलासह आत्महत्या

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

माजी गृहमंत्री अनिल देशमुख आज चंद्रपूरात होते. माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी अजित पवार यांचा वक्तव्याचा समाचार घेतला. देशमुख म्हणाले, मी बैठकीत होतो मात्र अजित पवार यांच्या सर्व निर्णयांना विरोध केला. ८३ वर्षांच्या बापाला त्रास होईल असे काही करणार नाही असे सांगितले. मला तर अजित दादा कोणतेही खाते द्यायला तयार होते. मी गेलो नाही असा दावा त्यांनी केला.