नागपूर : पेंच व्याघ्रप्रकल्पापासून तर ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पापर्यंत सर्वात श्रीमंत जैवविविधतेसह वन्यजीव कॉरिडॉरमध्ये मुनिया संवर्धन राखीव क्षेत्र आहे. या राखीव क्षेत्रात तब्बल ४६ कोळ्याच्या प्रजाती आढळून आल्या आहेत. विभागीय वनाधिकारी नरेंद्र चांदेवार यांचे हे संशोधन ‘जर्नल ऑफ एन्टॉमॉलाजी अँड झुआलॉजी स्टडिज’मध्ये प्रसिद्ध झाले आहे. मध्य भारतातील नागपूर जिल्ह्यातील मुनिया संवर्धन राखीव क्षेत्रातील कोळ्यांची प्रारंभिक विविधता आणि वितरणाचा हा पहिला संशोधन अहवाल आहे.

निसर्गचक्रात कोळ्याची भूमिका अतिशय महत्त्वाची आहे. निसर्गात समतोल राखण्याचे काम त्याच्याकडून केले जाते. बारीक कीटकांवर नियंत्रण ठेवण्याचे काम कोळ्याकडून होते. जमिनीवर पडलेला पालापाचोळा कुजवण्याचे काम कोळी करतात. नागपूर वनविभागाअंतर्गत बुटीबोरी आणि उत्तर उमरेड वनपरिक्षेत्राचा भाग असलेल्या मुनिया संवर्धन राखीवमध्ये ४६ कोळ्याच्या प्रजाती आढळून आल्या आहेत. त्या ४२ पिढ्या आणि १८ कुटुंबातील आहेत. विभागीय वनाधिकारी नरेंद्र चांदेवार यांचा मुनिया संवर्धन रिझर्व्हमधील कोळ्यांची प्रारंभिक विविधता आणि वितरणाचा पहिला संशोधन अहवाल मानांकित अशा कीटकशास्त्र आणि प्राणिशास्त्र अभ्यास पत्रिकेत प्रसिद्ध झालेला आहे. मुनिया संवर्धन राखीव क्षेत्रातील दाट जंगल, झुडपी क्षेत्र, गवताळ प्रदेश अशा विविध अधिवासात हे सर्वेक्षण करण्यात आले.

हेही वाचा – मराठा आरक्षण : सर्वेक्षणासाठी गेलेल्या शिक्षकाला मारहाण, यवतमाळातील घटना

हेही वाचा – राज्यात थंडीचा मुक्काम वाढला

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मुनिया संवर्धन राखीवची घोषणा झाल्यानंतर त्याचा व्यवस्थापन आराखडा तयार करायचा होता. वनस्पती, कीटक, गवत यांच्या प्रजातींच्या आधारावर हा आराखडा तयार होणार होता. किंबहुना आराखड्याची ती आधाररेखा होती. ती आधाररेखा शोधताना कोळ्यांच्या प्रजातींचा अभ्यास झाला आणि हे पहिलेच संशोधन ठरले. – नरेंद्र चांदेवार, विभागीय वनाधिकारी, नागपूर.