वाशिम: गेल्या १५ ते २० वर्षांपासून राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध संवर्गातील डॉक्टर, औषध निर्माण अधिकारी, आरोग्य सेविकांसह इतर कर्मचारी तुटपुंज्या मानधनावर कार्यरत आहेत. मात्र त्यांच्या मागण्यांकडे सरकार वेळोवेळी दुर्लक्ष करीत असल्याने जवळपास ६०० कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारला असून आरोग्य सेवा कोलमडली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य उप केंद्रापासून ते जिल्हा सामान्य रुग्णालयापर्यंत सेवा देत असलेले शेकडो आरोग्य कर्मचारी आजपासून बेमुदत संपावर गेले आहेत. मागील १५ ते २० वर्षांपासून खेडो पाड्यासह शहरी भागात जीवाचे रान करून सेवा देत आहेत. कोरोना काळात देखील कुटुंबाची पर्वा न करता देवदूत म्हणून उत्तम सेवा दिली होती.

हेही वाचा… कोल्हापुरी बंधाऱ्यांमुळे शेतशिवार हिरवळीने बहरला; २ हजार हेक्टर क्षेत्रावर सिंचन सुविधा, ६ तालुक्यात ८४ बंधारे

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मात्र गेल्या अनेक वर्षांपासून राष्ट्रीय आरोग्य अभियान कंत्राटी अधिकारी कर्मचारी समायोजन कृती समितीच्या वतीने अनेक आंदोलने, उपोषणे करून विविध मागण्यासाठी शासन स्तरावर मागण्या केल्या. तरीही त्याकडे सरकारचे दुर्लक्ष होत असल्याने कृती समितीच्या वतीने बेमुदत संप पुकारला असून समायोजन होत नाही. तोपर्यंत समान वेतन समान काम या व इतर मागण्यासाठी जिल्ह्यातील सहाशे डॉक्टर, औषध निर्माण अधिकारी, आरोग्य सेविका वैद्यकीय अधिकारी, यांच्यासह अनेक कर्मचारी सहभागी झाल्याने जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा कोलमडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.