नागपूर : शहरातील सर्वाधिक अपघात प्रवणस्थळ नावाने ओळखल्या जाणारा रस्ता म्हणजे अशोक चौक. हा चौक दररोज अपघाताला निमंत्रण देतो. चौकात खूप मोठी खुली जागा सुटल्यामुळे या रस्त्याचे नियोजन चुकल्याचे प्रथमदर्शनी लक्षात येते. याच कारणामुळे वाहनचालक संभ्रमात पडून अपघात होत आहेत.

खोलगट भागात असलेला अशोक चौक पावसाळ्यात तुडूंब भरलेला असतो. या चौकातून पायी वाट काढण्यास नाकी नऊ येतात. अशा स्थितीत पाऊस ओसरेपर्यंत वाहनचालकांना जैसे थे अशा स्थितीत किंवा आल्यापावली परत जावे लागते. अशोक चौकात पाच रस्त्यांचा मेळ आहे. येथे सिग्नलही खूप मोठ्या सेकंदाचा ठेवण्यात आला आहे. अशोक चौकातून उमरेड आणि भंडारा या दोन्ही मोठ्या शहराकडे जाण्यासाठी एसटी बस, ट्रक, टँकर, टिप्पर आणि जड वाहतुकीचे वाहनांची संख्या मोठी आहे. त्यामुळे जड वाहतुकीसाठी या चौकाची ओळख आहे. एसटी बसेसच्या फेऱ्यांची संख्या जास्त असल्यामुळे दर अर्ध्या तासाला बस धावतात. अशोक चौकातून जगणाडे चौकाकडे जाण्यासाठी तसेच सक्करदरा-उमरेड कडे जाण्यासाठी मार्ग आहे. एक मार्ग मेडिकल रुग्णालयाकडे तर दुसरा महाल-जुनी शुक्रवारीकडे जाण्यासाठी मार्ग आहे.

builder mastermind behind robbery on college road
कॉलेज रोडवरील दरोड्यामागे बांधकाम व्यावसायिक सूत्रधार; गुंडांकडून वृध्द दाम्पत्यास मारहाण
On the occasion of Prime Minister Narendra Modi visit to Kanhan Nagpur police force on high alert mode Nagpur
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा दौरा: नागपूर पोलीस ‘हाय अलर्ट मोड’वर; वाहतुक बदल जाणून घ्या…
Slum cleaning contract
झोपडपट्टी स्वच्छता कंत्राट : चौथ्यांदा मुदतवाढीची नामुष्की, १५ एप्रिलला न्यायालयात सुनावणी
The district administration announced the list of campaign materials along with food items in the list fixed to account for Lok Sabha election expenses pune
जिल्हाधिकाऱ्यांनी पुण्यात आणली ‘स्वस्ताई’; जाणून घ्या कशी?

हेही वाचा…पाच दिवसांत मोदी दुसऱ्यांदा नागपुरात, विमानतळावर गडकरी…

तसेच सर्वाधिक आवागमन असलेल्या सीताबर्डीकडे जाण्यासाठी महत्वाचा मार्गही अशोक चौकातून जातो. तसेच नंदनवन, सक्करदरा या मोठ्या भागातून मोठ्या प्रमाणात नोकरवर्ग सीताबर्डी किंवा सिव्हील लाईनमधील कार्यालयात जात असतात. त्यामुळे सर्वाधिक व्यस्त असलेल्या अशोक चौकाला विशेष महत्व प्राप्त झाले आहे. मात्र, या चौकातील दररोज होणाऱ्या किरकोळ आणि गंभीर अपघाताकडे वाहतूक पोलीस, महापालिका किंवा संबंधिक प्रशासनाचे लक्ष नाही. अशोक चौकातून अनेक शाळांकडे जाणारे रस्ते असून सकाळी आणि सायंकाळी स्कूलबस, स्कूलव्हॅनची मोठी संख्या असते. त्यामुळे विद्यार्थी अपघाताच्या सावटाखाली असतात. या चौकात वाहतूक पोलीस तासभरासाठी येतात आणि पुन्हा बेपत्ता होतात, अशी स्थिती नेहमीचीच असते. त्यामुळे वाहनचालकांवर वाहतूक पोलिसांचा वचक नसल्यानेही अपघातात वाढ होत आहे.

पोलीस चौकी एका कोपऱ्यात

अशोक चौकात खूप मोठी खुली जागा असल्यामुळे वाहतूक पोलिसांचे स्मार्ट बूथ हे सक्करदऱ्याकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कोपऱ्यात आहे. त्यामुळे या बूथमध्ये बसलेला वाहतूक पोलीस कर्मचारी वाहतुकीवर नियंत्रण कसे ठेवणार, हाच मोठा प्रश्न आहे. अशोक चौकातील सिग्नलचा कालवधी खूप मोठा असल्यामुळे सर्वाधिक नियम तोडण्याचे प्रमाण याच चौकात जास्त आहे.

हेही वाचा…अमित शाह अकोल्यात, लोकसभेच्या सहा मतदारसंघांतील तयारीची चाचपणी

पदपाथावर दुकाने आणि अतिक्रमण

चौकाचा आकार खूप मोठा असल्यामुळे चहुबाजूंनी दुकानदारांनी पदपाथ गिळंकृत केला. पदपाथावर काही हॉटेलचालकांनी खुर्च्या टाकून ग्राहकांना बसण्याची सोय केली आहे. तर काही दुकानदारांनी चक्क पदपाथावर पार्किंग व्यवस्था केली आहे. अशोक चौकाला अतिक्रमणाचा मोठा विळखा असल्यामुळे पादचारी पदपाथाऐवजी चक्क सडकेवरून चालतात तसेच वाहनांसाठी अरुंद रस्ता उरलेला असतो.

चौकात काय करायला हवे

पाच रस्त्यांचा चौक असलेल्या अशोक चौकात खूप मोठी जागा असल्यामुळे भरधाव जाणारे वाहनचालक संभ्रमात पडतात. त्यामुळे अपघात घडण्यासाठी अतिघाई कारणीभूत ठरते. त्यामुळे अपघातावर नियंत्रण मिळविण्याठी चौकाच्या मधोमध पोलिसांचा बूथ असायला हवा. जेणेकरून वाहनांचा वेग कमी होऊ शकतो. चौकातून भरधाव वाहन चालविता येणार नाही. त्यामुळे अपघाताच्या संख्येतही घट होईल.

हेही वाचा…नागपूरमध्ये भाजयुमोचा राष्ट्रीय मेळावा, ऐनवेळी जे.पी. नड्डा यांचा दौरा रद्द

मेडिकल रुग्णालय ते अशोक चौकातून महालमध्ये जाण्यापूर्वी अरुंद पुल आहे. त्या पुलावार नेहमी वाहतूक कोंडी असते. या कोंडीत वाहन अडकल्यानंतर बराच वेळ बाहेर निघण्यास लागतो. नागनदीच्या पाण्याचा घाण वास येत असल्यामुळे कोंडीतही श्वास गुदमरल्यासारखा होतो. – सूरज दहिकर (वाहनचालक)

हेही वाचा…video : ताडोबा महोत्सवात दोन वाघांची मारुतीला प्रदक्षिणा

अशोक चौकात अपघात होऊ नये वाहतूक पोलीस सतर्क असतात. वाहनांच्या गतीवर नियंत्रण राहावे म्हणून वाहतूक पोलीस वारंवार सूचना देतात. या चौकातून वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यां वाहनचालकांवर मोठ्या प्रमाणात कारवाई केल्या जाते. – जयेश भांडारकर, एसीपी ट्रॅफिक