scorecardresearch

४०० तृतीयपंथी घरांसाठी इच्छुक; ‘नासुप्र’ सवलतीच्या दरात सदनिका देणार

नागपूर सुधार प्रन्यासतर्फे तृतीय पंथीयांना सवलतीच्या दरात सदनिका उपलब्ध करण्यात येणार असून त्यासाठी तब्बल ४०० जण इच्छुक आहेत.

नागपूर : नागपूर सुधार प्रन्यासतर्फे तृतीय पंथीयांना सवलतीच्या दरात सदनिका उपलब्ध करण्यात येणार असून त्यासाठी तब्बल ४०० जण इच्छुक आहेत. नासुप्रने १ फेब्रुवारी २०२२ ला तृतीयपंथीयांसाठी सवलतीच्या दरात सदनिकेबाबत जाहिरात प्रकाशित केली होती. त्यास चांगला प्रतिसाद मिळाला आहे. शहरातून तब्बल ४०० अर्ज आले आहेत. यासंदर्भात नासुप्रचे सभापती मनोजकुमार सूर्यवंशी यांची तृतीयपंथीयांच्या प्रतिनिधींनी भेट घेतली.

सदनिकांसाठी जवळपास ३५० ते ४०० अर्ज केले आहेत. त्यावर सभापती यांनी लवकरात लवकर सवलतीच्या दरात सदनिका उपलब्ध करून द्याव्या, अशी मागणी प्रतिनिधी मंडळाने केली. सभापती यांनी तात्काळ कार्यवाही होण्याबाबत तसेच सदनिकेचे दर कमी करण्याकरिता शासनाकडून मदत घेण्यात येईल असे सांगितले. तसेच अनुदानाकरिता समाज कल्याण विभागाचे सचिव यांना कळवण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले.

या बैठकीत नासुप्र सभापती मनोजकुमार सूर्यवंशी, नासुप्रचे महाव्यवस्थापक निशिकांत सुके, कार्यकारी अभियंता (पूर्व) संजय चिमुरकर आणि विभागीय अधिकारी (पूर्व) लीना सोनवणे, तृतीयपंथीयांतर्फे किन्नर विकास बहुउदेशीय सामाजिक संस्थेचे अध्यक्ष राणी ढवळे, डॉ जानवा मस्के उपस्थित होते.

मराठीतील सर्व नागपूर ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Aspiring third party homes provide flats discounted rate ysh

ताज्या बातम्या