नागपूर : नागपूर महमेट्रोची सुरक्षा व्यवस्था भेदून, खापरी स्थानकावर उभ्या गाडीच्या दोन कोचवर अज्ञात इसम चक्क पेंटिंग करतो, डब्बे विद्रुप करतो आणि सुरक्षा व्यवस्थेच्या नजरेस ही बाब येत नाही याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या घटनेचा घटनाक्रम लक्षात घेता अनेक बाबी संशयास्पद वाटतात.

खापरी स्टेशनवर उभ्या मेट्रोचे विद्रुपीकरण करण्यात आल्याची बाब बुधवारी सकाळी उघडकीस आली. त्यानंतर महामेट्रोने याबाबत पोलिसांकडे तक्रार केली. मंगळवारी रात्री खापरी मेट्रो स्टेशनवर पायलट ट्रेन उभ्या होत्या. स्टेशन व ट्रेनच्या सुरक्षेसाठी मेट्रोचीच सुरक्षा व्यवस्था आहे. अज्ञात आरोपींनी येथील तैनात सुरक्षा रक्षकांच्या हातावर तुरी देत उभ्या मेट्रो कोचचे विद्रुपीकरण केले. जेवढ्या मोठ्या प्रमाणात हे विद्रुपीकरण झाले ते बघता त्याला तीन ते चार तास लागले असावे. मग सुरक्षा व्यवस्था त्या काळात काय करीत होती असा प्रश्न उपस्थित होतो.

हेही वाचा – नवेगाव-नागझिरालागत राज्य महामार्गावर वाघाचा मृत्यू

हेही वाचा – रेल्वेने प्रवासाला निघालात? थांबा, आधी ‘हे’ वाचा, १४ आणि १५ ऑगस्‍टला तब्बल ३३ गाड्या…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आरोपींनी ज्या पद्धतीने सुरक्षा व्यवस्थेस गुंगारा देत आपला उद्देश साध्य केला त्याच प्रकारे असामाजिक तत्व एखादे वेळी ट्रेनमध्ये घातपात घडविणारी वस्तू ठेवण्याची शक्यता नाकारता येत नाही. विद्रुपीकरणाचा प्रकार म्हणून या घटनेकडे दुर्लक्ष केले जाऊ शकते. मात्र सुरक्षेतील ही चूक गंभीर असून व्यावसायिक स्पर्धेतून हा प्रकार घडवून आणली असण्याची शक्यता आहे