नागपूर : विधानसभा अध्यक्ष पूर्वग्रहदूषित असणे लोकशाहीसाठी योग्य नाही. विधानसभा अध्यक्षांनी आमदार अपात्रतेचा निर्णय क्रांतिकारी पद्धतीने नाही तर संविधानातील तरतुदी व नियमानुसारच घेतला पाहिजे, असे आवाहन प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केले.

हेही वाचा – चंद्रपूर : मुंबईतील घटनेनंतर शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मुलींच्या वसतिगृहाची पाहणी करण्याचे आदेश

नार्वेकर यांनी एका कार्यक्रमात आपण लवकरच क्रांतिकारी निर्णय घेणार असल्याचे वक्तव्य केले होते. त्यावर लोंढे यांनी एका निवेदनाद्वारे नार्वेकर यांच्या हेतूबाबत शंका उपस्थित केली आहे. शिंदे फडणवीस सरकार हेच मुळात असंवैधानिक आहे. तत्कालीन राज्यपालांनी घेतलेला प्रत्येक निर्णय चुकीचा आहे. संविधान, लोकशाहीची पायमल्ली करत हे सरकार स्थापन झाले आहे. सदस्य अपात्रतेबाबत सर्वोच्च न्यायालयाने विशिष्ट कालमर्यादेत त्यावर निर्णय घ्यावा असे निर्देश दिले, परंतु अद्याप त्यावर निर्णय झालेला नाही, याकडेही लाेंढे यांनी लक्ष वेधले आहे.