scorecardresearch

बच्चू कडू करणार शिंदे-फडणवीस सरकारविरोधात आंदोलन; नेमकं कारण काय?

शेतकऱ्यांसाठी पाण्याच्या टाकीवरून चढणे असो किंवा एखाद्या सरकारी कर्मचाऱ्याच्या दालनात साप सोडणे असो, आमदार बच्चू कडू हे नेहमीच आपल्या अनोख्या आंदोलनांमुळे चर्चेत असतात.

बच्चू कडू करणार शिंदे-फडणवीस सरकारविरोधात आंदोलन; नेमकं कारण काय?
बच्चू कडू संग्रहित छायाचित्र

शेतकऱ्यांसाठी पाण्याच्या टाकीवरून चढणे असो किंवा एखाद्या सरकारी कर्मचाऱ्याच्या दालनात साप सोडणे असो, आमदार बच्चू कडू हे नेहमीच आपल्या अनोख्या आंदोलनांमुळे चर्चेत असतात. दरम्यान, ते पुन्हा एकदा अशाच प्रकारे अनोखं आंदोलन करणार आहेत. विशेष म्हणजे त्यांचे हे शिंदे-फडणवीस सरकारविरोधात असणार आहे. मात्र, हे आंदोलन करण्यामागे नेमकं काय कारण आहे? आणि त्याचं हे आंदोलन नेमकं कसं असणार आहे? या संदर्भात त्यांनी टीव्ही ९ या वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया दिली आहे.

हेही वाचा – “मठात बसून गांजा फुकणाऱ्यांनी…”; कालीचरण महाराजांच्या वादग्रस्त विधानावरून अमोल मिटकरी संतापले

काय म्हणाले बच्चू कडू?

आज आपल्या स्वातंत्र्य मिळून ७० वर्षांचा काळ लोटला आहे. मात्र, आजही देशातील जनता अन्न, वस्त्र व निवाऱ्यापासून वंचित आहे. आमदार, खासदार, बिल्डर यांचे एक नाही तर दहा-दहा घरं व्हायला लागली आहेत. मात्र, काही लोकं अजूनही मातीच्या घरात राहात आहेत. अनेक शेतकरी वर्षानुवर्षांपासून पालीत राहत आहेत. त्यांना पाणी कुठून मिळणार? आयुष्य कसं जाणार? शहरात मोठ्या लोकांच्या पोरांना स्टटी रुम मिळते. मात्र, गरीब शेतकऱ्याच्या मुलाला शिक्षण सुद्धा मिळत नाही. जेवढ्या शहरातल्या लोकांच्या बाथरूमा असतात, तेवढं शेतकऱ्याचे घरदेखील नसते, यामुद्द्यांकडे सरकारचे लक्ष वेधलं जावं, यासाठी आम्ही आंदोलन करणार आहोत, अशी प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी दिली आहे.

हेही वाचा – “सीमाप्रश्नाबाबत सरकार लवकरच विधिमंडळात ठराव आणणार”; मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती; म्हणाले, “काही लोकांकडून…”

केंद्र सरकारनं २०२२ मध्ये सर्वांना घर देणार, अशी घोषणा केली होती. शहरात पंतप्रधान आवास योजनेचे अडीच लाख रुपये दिले जातात. मात्र, त्याच योजनेचे गावात एक लाख १८ हजार रुपये दिले जातात. शहरात आणि खेड्यात एवढी तफावत का आहे? गावात घरकुलासाठी २१ अटी कशासाठी? आज आपण जातीभेद मागे टाकला आहे. मात्र, ग्रामीण आणि शहरी, असा भेद आजही सुरू आहे, त्यासाठी आम्ही आंदोनाचा निर्णय घेतला आहे, असेही ते म्हणाले.

हेही वाचा – ‘३२ वर्षाच्या तरुणाला सरकार घाबरलं’, आदित्य ठाकरेंच्या विधानावर गुलाबराव पाटलांची प्रतिक्रिया; म्हणाले, “माझ्या मुलाचं वय…”

कसं असेल बच्चू कडूंच्या आंदोलनाचे स्वरूप?

बच्चू कडू हे उद्यापासून सरकार विरोधात आंदोलन करणार आहेत. या दरम्यान ते आमदार निवासात न राहता, शेतातील पालीमध्ये राहणार आहेत. बच्चू कडू यांच्या बरोबर साधारण एक हजार कार्यकर्ते आंदोलनात सहभागी होणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. तसेच ३० डिसेंबरपर्यंत पालीत राहून अधिवेशनाला हजेरी लावू, असेही ते म्हणाले. दरम्यान, सरकारमध्ये असतानाही आंदोलनाची गरज का? असं विचारलं असता, आंदोलन करणं म्हणजे विरोध करणं, असं होत नाही. आंदोलन करणं म्हणजे लक्ष वेधणं होय. एखाद्या आईचं लेकरू ओरडलं तर याचा अर्थ ते आईच्या विरोधात आहे, असं होत नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 26-12-2022 at 23:25 IST

संबंधित बातम्या