नागपूर : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा गृहजिल्हा नागपूरमध्ये रामटेक जवळ मनसर, कन्हान येथे शिवसेना ठाकरे गटाचे युवा नेते व माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचे राज्याचे भावी मुख्यमंत्री अशा आशयाचे फलक युवा सेनेतर्फे लावण्यात आले.

आदित्य ठाकरे सोमवारी नागपूर दौऱ्यावर होते. ते वीज प्रकल्पामुळे होणाऱ्या प्रदूषणावर चर्चा करण्यासाठी पारशिवनी तालुक्यातील वराडा आणि नांदगावला जाणार होते. विमानतळावर ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी आदित्य यांचे जोरदार स्वागत केले. त्यांच्या स्वागतासाठी युवा सेनेने रामटेकजवळ मनसर, कन्हान येथे फलक लावले होते. त्यावर आदित्य यांचा उल्लेख भावी मुख्यमंत्री असा करण्यात आला होता.

हेही वाचा – ‘संभाजी भिडेंच्या सभेमुळे वर्ध्यात दंगल घडल्यास जबाबदार कोण?’, सभा उधळून लावण्याचा प्रयत्न, निषेधाच्या घोषणांनी तणाव

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यापूर्वी भाजपा नेते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, यांचेही भावी मुख्यमंत्री म्हणून फलक लावण्यात आले होते. नेत्यांनी आक्षेप घेतल्यावर फलक काढून घेण्यात आले होते. दरम्यान या फलकावर काँग्रेस नेते व माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले प्रत्येक कार्यकर्त्याला त्यांचा नेता मुख्यमंत्री व्हावा, असे वाटते, अशी भावना असणे स्वाभाविक आहे. पण महाविकास आघाडीचे सूत्र ठरले आहे. ज्यांच्याकडे आमदारांची संख्या अधिक तो मुख्यमंत्री होईल.