नागपूर : २६ मे रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे नागपुरात दोन कार्यक्रम आहेत. त्यासाठी २५ तारखेला रात्री अमित शहा शहरात दाखल होणार आहेत. त्यांच्या दौ-याच्या तयारीत पोलीस आणि प्रशासकीय यंत्रणा व्यस्त असताना शुक्रवारी २३ मे रोजी अंमलबजावणी संचालनालयाच्या (ई.डी.) अधिकाऱ्यांनी नागपुरातील हवाला व्यापारी शैलेष लखोटिया आणि सराफा व्यापारी पुरुषोत्तम कावळे यांचे घर आणि व्यावसायिक ठिकाणावरछापे घातले. ई.डी.च्या रायपूर कार्यालयातील अधिकाऱ्यांनी नागपूरच्या अधिकाऱ्यांच्या मदतीने ही कारवाई केली.
ई.डीचे अधिकारी शुक्रवारी सकाळी लखोटिया और कावळे यांच्या व्यासायिक ठिकाणी पोहचले व त्यांनाी तपासणी सुरू केली. पुरुषोत्तम कावळे यांचे इतवारी येथे ‘सागर ज्वेलर्स’ हे दुकान आहे तर गांधीसागर तलावाच्या जवळ त्याचा फ्लॅट आहे. या दोन्ही ठिकाणी एकाच वेळी ईडीचे अधिकारी धडकले.कावळे यांना चौकशीसाठी सोबत नेण्यात आले. दरम्यान कावळे यांच्यावर यापूर्वीही डीआरआईच्या पथकाने कारवाई केली होती.
सोने की तस्करी प्रकरणात त्यांना अटकही झाली होती. त्याच प्रमाणे हवाला व्यापारी शैलेष लखोटिया यांच्या वर्धनमान नगरमधील घरी आणि कार्यालयावरही ईडीने छापे घातले. लखोटिया हे हवाला सोबत ऑनलाइन सट्टा व्यवसायाशी संबंधित असल्याची शंका आहे.