विधान परिषदेच्या दहा जागांसाठी नुकतीच निवडणूक प्रक्रिया पार पडली आहे. या निवडणुकीत एकूण २८५ आमदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. पाच वाजता मतमोजणीला सुरुवात होणार होती. मात्र काँग्रेसने भाजपाचे आमदार लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक यांच्या मतदानावर आक्षेप घेतला. यामुळे मतमोजणीला विलंब झाला. दोन तासानंतर पुन्हा अखेर मतमोजणीला सुरुवात झाली आहे.

मात्र निकाल लागण्यापूर्वी महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले मुंबईतून नागपुरला रवाना झाले आहेत. नाना पटोले असं अचानक नागपुराल रवाना झाल्याने राजकीय वर्तुळात तर्क-वितर्क लढवले जात आहेत. पण आपण कौटुंबीक कार्यक्रमासाठी नागपुराला आल्याचं स्पष्टीकरण नाना पाटोले यांनी दिलं आहे.

यावेळी त्यांनी विधान परिषदेच्या निवडणुकीवर पुन्हा एकदा भाजपावर निशाणा साधला आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीत केंद्रीय तपास यंत्रणांचा आणि पैशांचा वापर झाल्याचं त्यांनी म्हटलं. तरीही महाविकास आघाडीचे सर्व उमेदवार निवडून येतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

माध्यमांशी बोलताना नाना पटोले म्हणाले की, “कौटुंबीक कार्यक्रम असल्याने मी नागपुरला आलो आहे. नाना पटोले हा पळ काढणारा नाही, तर लढणारा माणूस आहे.” . काँग्रेसने दोन मतांवर आक्षेप घेण्याबाबत विचारलं असता नाना पटोले म्हणाले की, “आम्ही संसदीय पद्धतीने जे काही नियम असतील, त्यानुसार आक्षेप घेतला आहे.”