भंडारा : कुणी खुनाच्या तर कुणी चोरीच्या गुन्ह्यात शिक्षा भोगत असलेले शेकडो कैदी मागील अनेक वर्षांपासून जिल्हा कारागृहात आहेत. कुटुंब व समाजापासून दुरावलेल्या या कैद्यांप्रती मानवतेचा दृष्टिकोन ठेऊन लॉयन्स क्लबच्यावतीने गोमय रक्षासूत्र रक्षाबंधनाचा अभिनव उपक्रम जिल्हा कारागृहात राबवण्यात आला. कित्येक वर्षांपासून घर न पाहणारे तुरुंगातील कैदी या उपक्रमाने चांगलेच भारावले. यावेळी ४०० कैद्यांना गोमय रक्षा सुत्र बांधून रक्षाबंधन सण साजरा करण्यात आला.

बहिण भावाच्या प्रेमाचे आणि जिव्हाळ्याचे प्रतीक समजला जाणारा रक्षाबंधन हा सण भंडारा जिल्हा कारागृहात आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला. महाराष्ट्र राज्य महा. एनजीओ फेडरेशन व लायन्स क्लब भंडारा ब्राससिटि, सुलभा बहुउद्देशीय शिक्षण संस्था भंडारा यांच्या संयुक्त विद्यमाने रक्षाबंधन निमित्त १२ ऑगस्ट रोजी भंडारा जिल्हा कारागृहात गोमय रक्षासूत्र कार्यक्रम घेण्यात आला. लॉ. अंतरराष्ट्रीय डिस्ट्रिक्ट ३२३४ एच१चे डिस्ट्रिक्ट गवर्नर भरत भलगट व लायन्स क्लब भंडारा ब्राससिटिचे अध्यक्ष डॉ.बबन मेश्राम यांच्या मार्गदर्शनात हा कार्यक्रम झाला. महा.एनजीओ फेडरेशन पुणे यांच्याकडून प्राप्त झालेल्या गाईच्या शेणापासून बनवलेल्या पर्यावरण पूरक राख्या कारागृहातील कैदी तसेच पोलीस बांधव, पोलीस कर्मचारी यांना बांधण्यात आल्या. या पर्यावरण पूरक राख्यांमुळे प्रदूषण टाळून पर्यावरण संवर्धन होईल असे मत यावेळी सुलभा बहुउद्देशीय शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा डॉ .सुलभा मेश्राम यांनी व्यक्त केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी

कॅबिनेट ऑफिसर एम.जे.एफ शेखर (बाळा)गभने होते. तर प्रमुख उपस्थितीत जिल्हा कारागृह अधीक्षक देवराव आडे , कारागृह निरीक्षक ब्रह्मा चोपकर ,कारागृह ए.एस.आय माणिक बंड,कारागृह लेडीज कॉन्स्टेबल रीना पिंगळे , कारागृह कर्मचारी,अधिकारी आणि कैदी बांधव व लाँयन्स क्लब भंडारा ब्राससिटी चे सदस्य, समता नगर फेज २ येथील प्रज्वल पँरामेडिकल इन्सिट्यूट चे विद्यार्थीनी उपस्थित होते.

याप्रसंगी अश्विनी शेखर गभने, स्विटि मोगेश खोब्रागडे, डॉ.सुलभा बबन मेश्राम, दर्शना आंबाडकर यांनी बंदिवानासह, कर्तव्यावरील पोलीस अधिकारी, कर्मचारी यांना राख्या बांधल्यात. पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना सण-उत्सव असले तरी सुट्टी मिळत नाही,ते आपल्या परीवारापासून दूर राहतात तसेच बंदीवान सुध्दा तुरुगांत असल्याने आपल्या लाडक्या बहिनेकडे जावू शकत नाही. प्रेमाचा बंधन बंदीवान यांना राखी बांधून आरती करत त्यांच्या दीर्घायुष्यासाठी व उज्ज्वल भविष्यासाठी प्रार्थना केली. तेव्हा बंदिवानासाठी हां क्षण घरातील सणांच्या आठवणीने भरलेला होता. अनेकांच्या डोळ्यात अश्रू तरळले तर काहींच्या चेहरेवर हास्य खुल्ले आणि वातावरण भावनिक झाले.

याप्रसंगी शेखर गभने यानी लाँयन डिस्ट्रिक्ट पीन लावून कारागृह अधिक्षक देवराव आडे यांना सन्मानित करण्यात आले. तर कारागृह प्रशासन यांनी बंध प्रेमाचा, बंध विश्वासाचा रक्षाबंधन गोमय रक्षासुत्र उपक्रमाचे प्रमुख शेखर मुंदडा पुणे,आयोजक भंडारा ब्राससिटी अध्यक्ष डॉ.बबन मेश्राम, सचिव अँड.मोगेश खोबरागड़े, शेखर गभने,प्रज्वल पँरामेडिकल भंडाराचे प्राचार्य डॉ.सुलभा मेश्राम यांचे आभार मानण्यात आले.