भंडारा : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी २४ जून रोजी भंडारा येथे ५४७ कोटी रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन केले. कार्यक्रमांच्या उद्घाटन प्रसंगी गोसेखुर्द प्रकल्पग्रस्तांनी कार्यक्रमस्थळी येऊन निषेध व्यक्त केला. त्यांनी मुख्यमंत्री मुर्दाबादच्या घोषणा दिल्या. बंदोबस्तावर तैनात असलेल्या पोलिसांनी प्रकल्पग्रस्तांना कार्यक्रमस्थळाहून बाहेर काढले. तर दुसरीकडे मुख्यमंत्र्यांच्या आगमनाप्रसंगी महामार्गावर काँग्रेस कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या वाहनापुढे काळे झेंडे दाखवून निषेध केला.

सोमवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे भंडारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना त्यांनी ५४७ कोटींच्या कामांचे भूमिपूजन केले. गोसेखुर्द प्रकल्पावरील जलपर्यटन प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील कामाचे भूमिपूजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. मात्र प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या अद्याप पूर्ण झालेल्या नाहीत. त्यामुळे प्रकल्पग्रस्त नाराज आहेत. त्यामुळे त्यांनी कार्यक्रम स्थळी मुख्यमंत्र्यांचे आगमन होताच व्यासपीठापुढे घोषणा देणे सुरू केले. त्यामुळे काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. तर दुसरीकडे मुख्यमंत्र्यांच्या आगमनाप्रसंगी महामार्गावर काँग्रेस कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या वाहनापुढे काळे झेंडे दाखवून निषेध केला. कार्यक्रमाला मुख्यमंत्री तब्बल ३ तास उशिरा पोहोचले. मात्र कार्यक्रम स्थळी उपस्थित नागरिकांसाठी कुलर आणि पाण्याची देखील सोय नसल्याने सगळ्यांनी आयोजकांच्या नावाने संताप व्यक्त केला.

हेही वाचा – वाशिम : दूषित पाण्यामुळे ५० पेक्षा अधिक ग्रामस्थांची प्रकृती बिघडली; अनेकांना उलटी, मळमळचा त्रास

मुख्यमंत्र्यांनी भूमिपूजन केलेल्या कामामध्ये जलपर्यटन केंद्र १०२ कोटी, भूमिगत गटार योजना १३० कोटी, भंडारा, पवनी तलाव सौंदर्यीकरण १०३ कोटी, रस्ते बांधकाम ७५ कोटी, नगरपालिका विकास कामे १ कोटी, पवनी नगरपालिका विकास कामे ९५ कोटी, भंडारा क्रीडा संकुल ७२ कोटी, तुमसर मार्ग चौक रस्ता सुधारणा ४० कोटींच्या कामाचा समावेश आहे.

हेही वाचा – VIDEO : पाचवेळा मातृत्त्व, १७ पेक्षा अधिक बछड्यांची आई; क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरही आहे चाहता जिचा, अशी ती…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भंडारा जिल्हा दौऱ्याकडे राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागले होते. मात्र त्यांना दौऱ्यात गोसेखुर्द प्रकल्पग्रस्तांच्या नाराजीला तोंड द्यावे लागले. त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या विरोधात घोषणा देऊन शासनाच्या विरोधात नाराजी व्यक्त केली. काँग्रेस कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवून मुख्यमंत्र्यांचा नषेध केला. मुख्यमंत्री कार्यक्रमाला उशिरा आल्याने जमलेल्या नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या उमेदवाराला पराभव पत्कारावा लागला होता. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा हा पहिलाच दौरा होता. त्यामुळे या दौऱ्याकडे राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागले होते. मुख्यमंत्री नागपूरहून भंडाऱ्याकडे गेले. त्यामुळे नागपुरातही मोठ्या प्रमाणात त्यांचे फलक लावण्यात आले होते. विधानसभा निवडणुकीची तयारी शिंदे यांनी सुरू केली असून त्यांनी पूर्व विदर्भावर लक्ष केंद्रित केल्याचे दिसून येते.