वर्धा : भारत जोडो अभियानाच्या माध्यमातून झालेली निवडणूकपूर्व राजकीय मशागत आघाडीच्या पथ्यावर पडण्याची शक्यता व्यक्त होते. शरद पवार वर्धेच्या सभेत म्हणाले, ‘ईथे जमलेली गर्दी ही आम्ही चांगला उमेदवार दिल्याची पावती आहे.’ कारण पवार यांना या सभेत दिसलेले चित्र वेगळेच होते. उमेदवार अमर काळे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे मात्र गर्दी पंजाच्या उपरण्यांची, आपच्या टोप्यांची व माकपच्या बावट्यांची. मात्र ही एका दिवसात झालेली गर्दी नव्हती. तब्बल एक वर्षापासून मोदी विरोधात भारत जोडो अभियानाच्या व्यासपीठावर सर्वांना एकत्रित करण्याची तयारी अविनाश काकडे यांच्या नेतृत्वात समविचारी गट करीत होता.

कट्टर काँग्रेस विरोधकांना कट्टर मोदी विरोधक करण्याची तयारी हळूहळू यशस्वी होत गेली. इंडिया अलायन्स म्हणून पुढे नामकरण झाले. त्यात मोदी विरोधक राजकीय नेतेच नव्हे तर व्यक्ती स्वातंत्र्य सर्वोच्च माननाऱ्या स्वयंसेवी संघटना पण सहभागी झाल्या. भारतीय लोकशाहीवर आलेले अभूतपूर्व हुकूमशाहीचे संकट परतवून लावण्याचा आमचा उद्देश असल्याचे अविनाश काकडे सांगतात.

wardha lok sabha seat, devendra fadnavis, not attend, campaign rally , discussion started, bjp, less crowd, sharad pawar, rally, marathi news, maharashtra politics,
शरद पवारांच्या तुलनेत देवेंद्र फडणवीस यांच्या फसलेल्या रॅलीची गावभर चर्चा; मात्र, भाजपा नेते म्हणतात…
chandrashekhar Bawankule Directs BJP Core Committee for Effective Campaign in Wardha Constituency
“काम बरोबर नाही, आत्ताच सावध व्हा,” चंद्रशेखर बावनकुळे यांनी कोणाला दिला इशारा; वाचा…
Sharad Pawar Wardha
रथातच बसणार… शरद पवारांचा हट्ट अन् नेत्यांची उडाली तारांबळ
ramdas tadas
‘‘हे एकदाचं थांबवा,” रामदास तडस यांना भाजप नेत्यांचा निर्वाणीचा इशारा

हेही वाचा – गुढीपाडव्यानिमित्त खरेदीचा उत्साह; घरखरेदीची कोट्यवधींची गुढी, वाहनांची आगावू नोंदणी, सराफा बाजारात गर्दी

गांधी-नेहरू विचारसरणीवर निस्सिम श्रद्धा ठेवून किसान अधिकार अभियानमार्फत कधीकाळी अनिल देशमुख, आर.आर.पाटील या मंत्र्यांच्या गाड्या अडवीत प्रश्न सोडवून घेणारा कार्यकर्ता ही अविनाश काकडे यांची जिल्ह्यातील ओळख आहे. पुढे जहाल शब्दात मोदींच्या धोरणांवर जाहीर टिका करीत कडवा मोदी विरोधक ही त्यांची ओळख बनली. आता निवडणुकीतच उत्तर द्यायचे असा चंग बांधून काकडे व त्यांचे सहकारी कामाला लागले. वर्धा लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे संभाव्य उमेदवार म्हणून सुनील केदार यांना गृहीत धरून गावपातळीवर संघटन बांधणी सुरू झाली. इंडिया अलायन्सच्या सभेत माकप, भाकप, संभाजी ब्रिगेड, जमाते इस्लाम ए हिंद, प्रहार सोशल फाेरम, भारत मुक्ती माेर्चा, आदीवासी विकास परिषद तसेच सेना ठाकरे गट, आप, राकाॅ, काँग्रेस या संघटना व पक्षाचे नेते हजेरी लावू लागले. व्यासपीठाचे समन्वयक म्हणून अविनाश काकडे यांना मिळालेले हे यश. या व्यासपीठाने एक चांगला उमेदवार द्या, असे साकडे महाविकास आघाडीच्या नेत्यांना पत्राद्वारे घातले. तसे घडले आणि व्यासपीठात चैतन्य आले. जहालपणे मोदी विरोध व्यक्त करणारे काकडे म्हणतात, मला काही कमवायचे नाही त्यामुळे गमावण्यासारखे काही नाही. विरोधकांची बांधलेली मोट निश्चित यश देणार.

हेही वाचा – तेलंगणा सीमेवरील तांदूळ तस्कर पुन्हा सक्रिय! राजकीय नेत्यांचा सहभाग?

वर्धेच्या सभेत देशपातळीवरील इंडिया आघाडीचे प्रतिबिंब पाहणाऱ्या पवार यांच्या व्यासपीठावर निमंत्रित करूनही काकडे गेले नाही. मात्र त्यांचे वलय अनुभवणारे राकाँ नेते अनिल देशमुख यांनी प्रा. सुरेश देशमुख यांच्याकडे थांबलेल्या शरद पवार यांच्याशी काकडे यांची भेट घालून दिलीच. त्या भेटीत हुकूमशाही विरूद्ध लोकशाही असा आमचा लढा असून संविधानावर श्रद्धा असणारे आम्ही एकत्र आलो असल्याचे काकडे यांनी पवारांना सांगितले. याच भेटीत काकडे यांनी केलेल्या पूर्व तयारीचा आढावा प्रा.सुरेश देशमुख व हर्षवर्धन देशमुख यांनी पवारांना सादर केला. काकडे यांनी घेतलेल्या व्यापक भूमिकेमुळे अमर काळे हे केवळ महाविकास आघाडीचे उमेदवार राहिलेले नसून मोदी विरोधाचे ते प्रतीक ठरले आहे. त्यामुळे राजकीय नेत्यांच्या प्रचारादरम्यान चालणाऱ्या रूसव्या फुगव्यांना आपसूक पायबंद बसल्याचे बोलल्या जाते.